Join us

मारुती सुझुकीला मिळाली ₹१३९ कोटींच्या GST ची नोटीस, कंपनी म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 4:22 PM

दिग्गज कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाला जीएसटी प्राधिकरणाकडून नोटीस मिळाली आहे.

दिग्गज कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाला जीएसटी प्राधिकरणाकडून कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, मारुतीला वस्तू आणि सेवा कर प्राधिकरणाकडून ही नोटीस मिळाली आहे. ही नोटीस जुलै २०१७ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी आहे. 

जीएसटी प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटीसमध्ये त्यांना व्याज आणि दंडासह १३९.३ कोटी रुपयांचा कर भरावा लागणार असल्याचं म्हटलं आहे. कंपनीन आधीच जीएसटी भरला आहे. मात्र, ही नोटीस काही सेवांबाबत रिव्हर्स चार्ज बेसवर आधारित आहे. याचा कोणत्याही कामकाजावर परिणाम झालेला नाही. आपण या नोटीसला योग्य उत्तर देणार असल्याचं मारुती सुझुकीनं म्हटलंय.

अन्य कंपन्यांनाही नोटीसकाही दिवसांपूर्वी विविध क्षेत्रातील कंपन्यांना जीएसटी डिमांड नोटीस पाठवण्यात येत आहेत. जुलै २०१७ ते मार्च २०२२ दरम्यान टॅक्स न भरल्याबद्दल ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सला अलीकडेच १,७२८ कोटी रुपयांची 'डिमांड नोटीस' पाठवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अनेक ऑनलाइन गेमिंग अॅप कंपन्यांनाही नोटिसा आल्या आहेत. मोबाइल अॅप-आधारित स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम ११ ने जीएसटी नोटिसीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील केलेय.

टॅग्स :मारुती सुझुकीजीएसटी