Join us  

Maruti Suzuki Q1 Results : २.५ पटींनी वाढला मारुती सुझुकीचा नफा, पाहा ३ महिन्यांत कंपनीनं किती विकल्या कार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 3:36 PM

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात प्रचंड वाढ झाली आहे.

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या (Maruti Suzuki Q1 Results) पहिल्या तिमाहीतील नफ्यात प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीच्या नफ्यात सुमारे अडीच पटींनी वाढ झाली. जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा दुपटीनं वाढून 2485 कोटी रुपयांवर पोहोचला. पहिल्या तिमाहीत मारुती सुझुकीचा ऑपरेटिंग महसूल वार्षिक 22 टक्क्यांनी वाढून 32,327 कोटी रुपये झालाय.

देशातील सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपनीनं जून तिमाहीत 4,98,030 कार्सची विक्री केली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 6.4 टक्क्यांनी अधिक आहे. त्याच वेळी, देशांतर्गत बाजारात कंपनीची विक्री 9 टक्क्यांनी वाढून 4,34,812 युनिट्स झाली. त्याच वेळी, निर्यात 9 टक्क्यांनी घसरून 63,218 युनिट्सवर आली आहे.

कंपोनंट्सची कमतरताजून तिमाहीत इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्सच्या कमतरतेमुळे, 28,000 पेक्षा अधिक वाहनांचं उत्पादन होऊ शकलं नाही, असं कंपनीनं एका निवेदनात म्हटलंय. तिमाहीच्या अखेरीस ग्राहकांच्या प्रलंबित ऑर्डरची संख्या सुमारे 3,55,000 वाहनांची होती. या ऑर्डर्सची पूर्तता लवकर करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

शेअरमध्ये तेजीमारुती सुझुकीचा शेअर सोमवारी वाढीसह बंद झाला. कंपनीचा शेअर 1.42 टक्क्यांनी किंवा 137.35 रुपयांनी 9806.25 रुपयांवर बंद झाला. परंतु मंगळवारी यात घसरण दिसून आली. मंगळवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात मारुतीचा शेअर 1.08 टक्क्यांच्या घसरणीसह 9710 रुपयांवर आला. 

टॅग्स :मारुती सुझुकीशेअर बाजार