Lokmat Money > बिझनेस न्यूज > मारुतीचा नफा घटला; विक्रीही मंदावली

मारुतीचा नफा घटला; विक्रीही मंदावली

जुलै-सप्टेंबर काळात गेल्या वर्षी हाच नफा 2484 कोटी झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 11:46 AM2018-10-26T11:46:24+5:302018-10-26T11:46:41+5:30

जुलै-सप्टेंबर काळात गेल्या वर्षी हाच नफा 2484 कोटी झाला होता.

Maruti's profit and Sales went down | मारुतीचा नफा घटला; विक्रीही मंदावली

मारुतीचा नफा घटला; विक्रीही मंदावली

देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी मारुती सुझुकीचा नफा 10 टक्क्यांनी घटला असून वाहनांची विक्रीही 1.5 टक्क्यांनी कमी झाली आहे. जुलै-सप्टेंबर काळात गेल्या वर्षी हाच नफा 2484 कोटी झाला होता. तर यंदा 2240.40 कोटी झाला आहे. मागील चार वर्षात पहिल्यांदाच नफ्यामध्ये घट झाली आहे. 


जानेवारी-मार्च 2014 मध्ये नफा 35 टक्क्यांनी घटला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि बाजारातील उतार चढाव यामुळे नफ्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत असले तरीही या वर्षी 1.5 टक्क्यांनी वाहनांची विक्री कमी झाली आहे. तसेच एक्सपोर्टही 15 टक्क्यांनी घसरून 29,448 युनिट राहिला आहे.


तर मारुतीच्या महसुलामध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा हा महसूल 22433 कोटी रुपये झाला असून गेल्यावर्षी तिसऱ्या तिमाहीत हाच महसूल 21,768.2 कोटी एवढा होता.


नफा घटल्याच्या वृत्तानंतर मारुती सुझुकीच्या बीएसई शेअर्समध्ये 0.65 टक्क्यांची घसरण झाली. तर एनएसईवर 0.64 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली.
 

Web Title: Maruti's profit and Sales went down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.