देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी मारुती सुझुकीचा नफा 10 टक्क्यांनी घटला असून वाहनांची विक्रीही 1.5 टक्क्यांनी कमी झाली आहे. जुलै-सप्टेंबर काळात गेल्या वर्षी हाच नफा 2484 कोटी झाला होता. तर यंदा 2240.40 कोटी झाला आहे. मागील चार वर्षात पहिल्यांदाच नफ्यामध्ये घट झाली आहे.
जानेवारी-मार्च 2014 मध्ये नफा 35 टक्क्यांनी घटला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि बाजारातील उतार चढाव यामुळे नफ्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत असले तरीही या वर्षी 1.5 टक्क्यांनी वाहनांची विक्री कमी झाली आहे. तसेच एक्सपोर्टही 15 टक्क्यांनी घसरून 29,448 युनिट राहिला आहे.
तर मारुतीच्या महसुलामध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा हा महसूल 22433 कोटी रुपये झाला असून गेल्यावर्षी तिसऱ्या तिमाहीत हाच महसूल 21,768.2 कोटी एवढा होता.
नफा घटल्याच्या वृत्तानंतर मारुती सुझुकीच्या बीएसई शेअर्समध्ये 0.65 टक्क्यांची घसरण झाली. तर एनएसईवर 0.64 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली.