Join us

जबरदस्त! ऑगस्टमध्ये UPI चा मोठ्या प्रमाणात वापर, १० अब्ज व्यवहाराचा टप्पा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 12:59 PM

ऑगस्टमधील UPI पेमेंटने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

भारतात गेल्या काही वर्षापासून डिजीटल व्यवहाराला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात युपीआय वापरणाऱ्यांची संख्या झाली असून आजकाल, लोक रोख व्यवहाराऐवजी, लहान पेमेंटसाठी UPI वापरत आहेत. या कारणास्तव, देशातील UPI व्यवहारात प्रचंड वाढ होत आहे.

मोठं नुकसान! अदानी समूहाच्या शेअर्सचा LIC ला हादरा; एकाच दिवसात 1439 कोटी स्वाहा!

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ऑगस्टसाठी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. NPCI नुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये देशभरात १० अब्जाहून अधिक UPI व्यवहार झाले आहेत. ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत, एकूण १०.२४ अब्ज UPI व्यवहार १५.१८ अब्ज म्हणजेच १५,१८,४८६ कोटी रुपयेद्वारे केले आहेत. दुसरीकडे, जुलैमध्ये यूपीआयद्वारे एकूण ९.९६ अब्ज रुपयांचे व्यवहार झाले. तर जूनमध्ये हा आकडा ९.३३ अब्ज रुपये होता.

NPCI ने जारी केलेला डेटा दर्शवितो की ऑगस्ट 2022 च्या तुलनेत UPI व्यवहारांमध्ये सुमारे ५० टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत एकूण ६.५० अब्ज व्यवहार झाले होते, जे आता १० अब्जांहून अधिक झाले आहेत. ऑक्टोबर २०१९ हा पहिला महिना होता जेव्हा देशभरातील वापरकर्त्यांनी १० अब्ज पेक्षा जास्त वेळा UPI चा वापर केला होता. तेव्हापासून, UPI वापरकर्त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

'या' अॅप्सचा सर्वाधिक वापर 

UPI वापरकर्ते पेमेंटसाठी वेगवेगळे अॅप वापरतात. स्वदेशी कंपनी PhonePe ने या बाबतीत इतर सर्व अॅप्स मागे टाकले आहेत आणि जून २०२३ मध्ये काही UPI व्यवहारांमध्ये त्याचा हिस्सा ४७ टक्क्यांहून अधिक होता. तर Google Pay या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचा वाटा ३५ टक्के आहे. पेटीएम या यादीत १४ टक्के शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :व्यवसायगुगल पे