Join us

सचिन तेंडुलकरकडेही आहेत ४.३ लाख शेअर्स, '₹१६०० पार जाणार स्टॉक'; एक्सपर्ट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:57 AM

कंपनीनं नुकतीच रोल्स रॉयससोबतही मोठी डील केलीये.

Azad Engineering Share: आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडचे ​​शेअर्स सातत्यानं फोकसमध्ये असतात. शेअर बाजारातील एक्सपर्ट कंपनीच्या शेअर्सवर उत्साही वाटत असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे शेअर्स लवकरच 1600 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात.  

आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडचे ​​शेअर्स सध्या 1,212 रुपयांवर आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने 1600 रुपयांच्या टार्गेट प्राईजसह आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. या कंपनीच्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचीही गुंतवणूक आहे. 

केल्यात मोठ्या डील्स? 

आझाद इंजिनिअरिंगनं अनेक मोठ्या डील्स केल्या आहेत. आझाद इंजिनिअरिंगने आईल अँड गॅस कंपनी बेकर ह्यूजेससोबत पाच वर्षांचा स्ट्रॅटेजिक सप्लाय अॅग्रीमेंट (SSA) केला आहे. आझाद इंजिनिअरिंगसोबत हा दीर्घकालीन करार आहे. या ऑर्डरमध्ये ऑईल फिल्ड सर्व्हिसेससाठी मीडियम टू हाय कॉम्प्लेक्स प्रिसिशन मशीन्ड कम्पोनन्टचा सप्लाय केला जाणार आहे. यापूर्वी त्यांनी ऑईल अँड गॅस सेक्टसाठी कम्पोनन्ट्स सप्लायसाठी नुओवो पिग्नोन एसआरएलसोबत एक करार केला होता. याशिवाय कंपनीनं नुकतीच रोल्स रॉयससोबतही डील केलीये. 

महिन्याभरात पैसे झाले दुप्पट 

आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ आला होता तेव्हा कंपनीनं त्याचा प्राईज बँड 499 ते 524 पर्यंत निश्चित केला होता. कंपनीनं 28 शेअर्सचा एक लॉट तयार केला होता.. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 14,672 रुपयांची गुंतवणूक करावी लागली. ज्या गुंतवणूकदारांना कंपनीनं IPO दरम्यान शेअर्सचे वाटप केले होते, त्यांचे पैसे आतापर्यंत दुप्पट झाले आहेत. आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स बीएसईवर 28 डिसेंबर रोजी 720 रुपयांवर लिस्ट झाले होते.

 

सचिन तेंडुलकरचीही गुंतवणूक 

कंपनीच्या शेअर होल्डिंगनुसार माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडे कंपनीचे 4.3 लाख शेअर्स होते. त्यानं मार्च 2022 मध्ये 114.10 रुपये प्रति शेअर या दरानं हे शेअर्स खरेदी केले. याशिवाय सायना नेहवाल, पीव्ही सिंधू आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही या कंपनीत गुंतवणूक केली आहे. या तिन्ही खेळाडूंचे प्रत्येकी 44 हजार शेअर्स होते. यापैकी एकाही स्टारनं आयपीओ दरम्यान शेअर्स विकले नव्हते.  

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :सचिन तेंडुलकरशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग