Join us

EPFO मध्ये कोट्यवधींची फसवणूक; ८१७  खात्यांत गैरव्यवहार, पटापट तपासा बॅलन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 5:01 PM

EPFO च्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: EPFO च्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मार्च २०२० ते जून २०२१ या कोरोना संकटाच्या कालावधीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मुंबई कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधातून २१ कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कॉमन पीएफ पूलद्वारे फसवणूक करण्यात आलीय. यापैकी सुमारे २१ कोटी रुपये काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (masterminded clerk siphoned rs 21 crore through nexus at mumbai epfo office scam) 

TATA ग्रुप आता ‘ही’ सरकारी कंपनी खरेदी करण्यास इच्छुक; केंद्राने दिली तत्त्वतः मंजुरी!

आतापर्यंत केलेल्या तपासानुसार घोटाळ्याचा मास्टरमाइंड मुंबई कांदिवली ईपीएफओ कार्यालयाचा अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे, ज्याने पीएफ दावा करण्यासाठी स्थलांतरित कामगाराच्या ८१७ बँक खात्यांचा कथितपणे गैरवापर केला होता. या पीएफ खात्यातून एकूण २१.५ कोटी रुपयांची हेराफेरी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Tata ने रचला इतिहास; TCS चे बाजारमूल्य १३ लाख कोटींवर, Reliance च्या काहीच पाऊल दूर!

मुंबई कार्यालयातील ५ कर्मचारी सामील

या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या पैशांपैकी ९० टक्के रक्कम काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. याशिवाय मुंबई कार्यालयातील ५ कर्मचारी या फसवणुकीमध्ये सामील आहेत, त्यापैकी मुख्य आरोपी फरार आहेत. अंतर्गत लेखापरीक्षण पूर्ण होताच ईपीएफओ हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणार असल्याचे सांगितले जात आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Adani ग्रुपचा आता राज्याच्या व्यापारी मार्गावरही ताबा; ‘या’ कंपनीशी १६८० कोटींचा व्यवहार

असा तपासा बॅलन्स

दरम्यान, जर तुमचे UAN EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या ताज्या योगदानाची आणि PF शिल्लक माहिती एका मेसेजद्वारे मिळवू शकता. ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमीळ, मल्याळम आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे. उमंग अॅपद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक देखील तुम्ही तपासू शकतात. तुम्ही ईपीएफओ वेबसाईटद्वारे बॅलन्स देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला EPFO ​​पासबुक पोर्टलवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या यूएएन आणि पासबुकने लॉगिन करावे लागेल. यानंतर तुम्हाला डाऊनलोड व्ह्यू पासबुक या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 

टॅग्स :गुन्हेगारीभविष्य निर्वाह निधीमुंबई