नवी दिल्ली - मे २0१८मध्ये देशाच्या सर्व प्रमुख शहरांत फ्रेशरांच्या (पहिलीच नोकरी असलेले तरुण) नोकरभरतीत १५ टक्के वाढ झाली आहे. फ्रेशर लोकांच्या नोकर भरतीतील वाढ हे रोजगारनिर्मितीत स्थिर व दमदार वाढ होत असल्याचे लक्षण आहे, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे.
मे २0१८साठी जारी करण्यात आलेल्या ‘नौकरी जॉब स्पीक इंडेक्स’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, मे महिन्यात देशातील एकूण नोकरभरतीत ११ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वाहन, बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सर्वाधिक नोकरभरती झाली आहे. दूरसंचार आणि एफएमसीजी उद्योगातही भरतीचे प्रमाण वाढले आहे. वाहन क्षेत्रातील नोकर भरतीत ३१ टक्के, तर बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकर भरतीत २१ टक्के वाढ झाली आहे.
मे महिन्यात झाली फ्रेशर्सच्या नोकर भरतीत १५% वाढ
मे २0१८मध्ये देशाच्या सर्व प्रमुख शहरांत फ्रेशरांच्या (पहिलीच नोकरी असलेले तरुण) नोकरभरतीत १५ टक्के वाढ झाली आहे. फ्रेशर लोकांच्या नोकर भरतीतील वाढ हे रोजगारनिर्मितीत स्थिर व दमदार वाढ होत असल्याचे लक्षण आहे, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:55 AM2018-06-14T00:55:37+5:302018-06-14T00:55:37+5:30