Join us

मे महिन्यात घटली महागाई, औद्योगिक उत्पादन वाढले

By admin | Published: June 12, 2017 8:25 PM

अन्न पदार्थांच्या किमती कमी झाल्याने मे महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दरात घट झाली आहे. मे महिन्यात महागाईचा दर एप्रिलमधील

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - अन्न पदार्थांच्या किमती कमी झाल्याने मे महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दरात घट झाली आहे. मे महिन्यात महागाईचा दर एप्रिलमधील 2.99 टक्क्यांवरून कमी होऊन 2.18 टक्के झाला आहे. महागाई कमी झाल्याने ऑगस्टमध्ये होणाऱ्या द्वैमासिक समीक्षेत रिझर्व्ह बँक व्याजदरात घट करण्याची शक्यता आहे. महागाईची आकडेवारी मोजण्यासाठी 2012 हे मुलभूल वर्ष ठरविण्यात आल्यापासून महागाईच्या दराने गाठलेली ही निचांकी पातळी आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सून समाधानकारक राहण्याची घोषणा केल्याने पुढच्या काळातही महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे. 
जून ते सप्टेंबर या काळात भारतात 70 टक्के पाऊस पडतो. जर पाऊस चांगला झाला तर भरघोस उत्पादनामुळे पुढच्या काळातही महागाईवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चलन समीक्षेत रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात कुठल्याही प्रकारचे बदल केले नव्हते. विशेष बाब म्हणजे महागाईच्या दरात झालेली घट ही रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा कमी आहे. या काळात महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत नियंत्रित करण्याचे निश्चित केले होते. 
  या काळात गेल्यावर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या किमतीत 1.05 टक्के घट झाली आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. मार्चमध्ये औद्योगिक वृद्धीचा दर 2.7 टक्के होता. हा दर एप्रिलमध्ये वाढून 3.1 टक्के झाला आहे.