Lokmat Money > बिझनेस न्यूज > अयोध्या बनतेय बिझनेस हब, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी या कंपन्यांकडून प्लांट उभारण्यास सुरुवात

अयोध्या बनतेय बिझनेस हब, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी या कंपन्यांकडून प्लांट उभारण्यास सुरुवात

राम मंदिर सुरू होण्यापूर्वीच अयोध्या बिझनेस हब बनण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 11:28 AM2024-01-05T11:28:39+5:302024-01-05T11:33:39+5:30

राम मंदिर सुरू होण्यापूर्वीच अयोध्या बिझनेस हब बनण्याच्या तयारीत आहे.

mc donald to burger singh bisleri to open business in ayodhya ahead of ram mandir consecration | अयोध्या बनतेय बिझनेस हब, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी या कंपन्यांकडून प्लांट उभारण्यास सुरुवात

अयोध्या बनतेय बिझनेस हब, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी या कंपन्यांकडून प्लांट उभारण्यास सुरुवात

अयोध्या : राम मंदिराबाबत देशातील जनता आणि रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तसेच, राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारीही जोरात सुरू आहे. 22 जानेवारीला मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी अयोध्येत सर्वसामान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनीही तयारी जोरात सुरू केली आहे. विशेषत: एफएमसीजी आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना यामध्ये मोठी संधी दिसत आहे. अशा स्थितीत राम मंदिर सुरू होण्यापूर्वीच अयोध्या बिझनेस हब बनण्याच्या तयारीत आहे.

अयोध्येत उभारले जाणारे राम मंदिर हे देशातील सर्वात महत्त्वाचे धार्मिक केंद्र आणि तीर्थक्षेत्र असणार आहे. रामजन्मभूमी मंदिरावर कोट्यवधी लोकांची श्रद्धा असून या मंदिराच्या उभारणीची प्रतीक्षा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात अयोध्या हे धार्मिक पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचे मोठे केंद्र बनणार आहे. ज्याचा फायदा येथील अर्थव्यवस्थेला होईल. या बदलात लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. एफएमसीजी कंपन्या आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठीही संधी निर्माण होत आहेत. येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू होणार आहेत.

बिसलेरी कंपनी उभारतेय प्लांट
ईटीच्या रिपोर्टनुसार, एफएमसीजी आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांनी आपली तयारी तीव्र केली आहे. मिनरल वॉटर कंपनी बिसलेरी इंटरनॅशनल अयोध्येत नवीन प्लांट उभारत आहे. येत्या काही दिवसांत अयोध्येत बाटलीबंद पाणी, सॉफ्ट ड्रिंक्स, स्नॅक्स, किराणा सामान आदींची मागणी वाढू शकते, अशी कंपनीची अपेक्षा आहे. पार्ले प्रॉडक्ट्स ही बिस्किटे आणि इतर एफएमसीजी उत्पादने बनवणारी कंपनी अयोध्येत आणि आसपासमधील वितरण नेटवर्क वाढवत आहे. मॅकडोनाल्ड आणि बर्गर सिंग अयोध्या-लखनौ महामार्गावर एक नवीन आउटलेट उघडत आहेत.

पर्यटकांची संख्या वाढू शकते
राम मंदिर पूर्ण झाल्यावर अयोध्येतील पर्यटन 8-10 पटीने वाढू शकेल. यामुळे शहरात फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणजेच तात्पुरती लोकसंख्या वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. हॉस्पिटॅलिटी कंपनी ओयोने नुकतेच सांगितले होते की, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच हॉटेल बुकिंगमध्ये 70-80 टक्के वाढ दिसून येत आहे. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये अयोध्येला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या केवळ 3.25 लाख होती, जी 2022 मध्ये 85 पटीने वाढून 2.39 कोटी झाली. आता मंदिर तयार झाल्यावर त्यात 8-10 पट वाढ होईल, त्यामुळे दरवर्षी अंदाजे 20-25 कोटी पर्यटक अयोध्येत येऊ शकतात.

Read in English

Web Title: mc donald to burger singh bisleri to open business in ayodhya ahead of ram mandir consecration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.