फास्ट फूडच्या दुनियेतील मॅकडॉनल्ड्स (McDonald's) हे नाव घेतलं, तर फारच कमी लोक असतील, ज्यांना याची माहिती नसेल. त्यांचे बर्गर हे अतिशय लोकप्रिय आहेत. याशिवाय त्याची आउटलेट्सही जवळजवळ सगळीकडे पाहायला मिळतात.
इंग्लंडमध्ये राहणारे रिचर्ड आणि मॉरिस मॅकडॉनल्ड या दोन भावांनी १५ मे १९४० रोजी म्हणजेच ८४ वर्षांपूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये याची सुरुवात केली आणि आज ११९ देशांमध्ये त्यांच्या ४२ हजारांहून अधिक फ्रेन्चायझी आहेत. यासंबंधीच्या काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्या प्रत्येक मॅक-डी प्रेमीला माहित असायला हव्या.
भाऊ कामाच्या शोधात अमेरिकेत आले
कॅलिफोर्नियापासून सुरू झालेल्या या कंपनीनं आज अनेक लोकांना भुरळ पाडली आहे. पण त्याच्या चवीप्रमाणेच त्याची कहाणीही अतिशय रंजक आहे. इंग्लंडमध्ये राहणारे रिचर्ड आणि मॉरिस मॅकडॉनल्ड हे दोन भाऊ कॅलिफोर्नियात आले आणि त्यांनी १९४० साली मॅकडॉनल्डची सुरुवात केली. कामाच्या शोधात इंग्लंडहून अमेरिकेत आलेल्या या भावांनी आधी फिल्म्सचा व्यवसाय केला, पण तो चालला नाही. तेव्हा त्यांनी डाइन इन रेस्टॉरंट सुरू केलं. रिचर्ड आणि मॉरिस यांनी रेस्टॉरंटमध्ये एक छोटा मेन्यू ठेवला होता, त्यामागे त्यांचा उद्देश चव आणि गुणवत्ता दोन्ही राखणं हा होता. त्यामुळे कॅलिफोर्नियात हे रेस्टॉरंट अल्पावधीतच हिट झालं.
रे क्रॉस यांनी केला कंपनीचा विस्तार
दरम्यान, रेस्तराँवर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत होती. अशात दोन्ही भावांनी रे क्रॉस नावाच्या सेल्समनकडून ६ मिक्सर खरेदी केले. आता रे क्रॉससाठी मशीनची ही ऑर्डर त्या काळात छोटी नव्हती, त्यामुळे त्यांनाही आश्चर्य वाटल आणि ते रेस्टॉरंट बघायला गेले. इथली गर्दी पाहून त्यांनी मॅकडॉनल्ड फ्रेन्चायझी विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मॅकडॉनल्ड बंधूंशी चर्चा केल्या. करारावर शिक्कामोर्तब झालं आणि रे यांना फ्रेन्चायझी तर मिळालीच, पण ते मॅकडॉनल्ड्सचे फ्रेन्चायझी एजंटही बनले. त्यानंतर १९६१ मध्ये रे यांनी मॅकडॉनल्ड्स विकत घेऊन जगातील अनेक देशांमध्ये कंपनीचा विस्तार केला.
१९६७ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश
१९६७ मध्ये मॅकडॉनल्ड्सनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि कॅनडामध्ये आपलं पहिले रेस्तराँ उघडलं. आज मॅक-डीच्या ११९ देशांमध्ये ४२ हजारांहून अधिक फ्रेन्चायझी आहेत.
भारतासमोरील आव्हानं
भारताबद्दल बोलायचं झालं तर १९९६ मध्ये येथे याची सुरुवात झाली, या दरम्यान कंपनीला मोठ्या आव्हानांचा ही सामना करावा लागला. भारताच्या म्हणण्यानुसार, कंपनीनं आपल्या मेन्यूमध्ये अनेक बदल केले होते, तसेच गोमांसाला मेन्यूमधून बाहेरचा रस्ता दाखवावा लागला होता.