Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'ही' कंपनी येत्या तीन वर्षांत 5 हजार लोकांना देणार नोकऱ्या, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन 

'ही' कंपनी येत्या तीन वर्षांत 5 हजार लोकांना देणार नोकऱ्या, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन 

कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने पीटीआयशी केलेल्या संभाषणात सांगितले की, मॅकडोनाल्डची उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागातील रेस्टॉरंटची संख्या पुढील तीन वर्षांत 300 पर्यंत दुप्पट करण्याची योजना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:00 PM2022-12-12T23:00:09+5:302022-12-12T23:04:03+5:30

कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने पीटीआयशी केलेल्या संभाषणात सांगितले की, मॅकडोनाल्डची उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागातील रेस्टॉरंटची संख्या पुढील तीन वर्षांत 300 पर्यंत दुप्पट करण्याची योजना आहे.

McDonald's will give jobs to five thousand persons in next three years | 'ही' कंपनी येत्या तीन वर्षांत 5 हजार लोकांना देणार नोकऱ्या, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन 

'ही' कंपनी येत्या तीन वर्षांत 5 हजार लोकांना देणार नोकऱ्या, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन 

नवी दिल्ली : फास्ट फूड रेस्टॉरंट मॅकडोनाल्ड्स इंडियाने (नॉर्थ अँड ईस्ट) सोमवारी आपल्या आउटलेटची संख्या पुढील तीन वर्षांत दुप्पट करण्याची आणि जवळपास 5,000 लोकांना कामावर घेण्याची योजना जाहीर केली. कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने पीटीआयशी केलेल्या संभाषणात सांगितले की, मॅकडोनाल्डची उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागातील रेस्टॉरंटची संख्या पुढील तीन वर्षांत 300 पर्यंत दुप्पट करण्याची योजना आहे. या दरम्यान सुमारे 5 हजार लोकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

कंपनीचा विस्तारवर असेल फोकस...

- मॅकडोनाल्ड्सने आपल्या विस्ताराच्या टप्प्याचा एक भाग म्हणून सोमवारी गुवाहाटीमध्ये भारतातील सर्वात मोठे रेस्टॉरंट उघडले. हे रेस्टॉरंट 6,700 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे आणि येथे 220 लोक एकत्र बसू शकतात.

- कंपनी वेगाने वाढत आहे आणि या क्रमाने राज्यांमध्ये कंपनीचे नेटवर्क वाढवू इच्छित आहे, असे मॅकडोनाल्डचे इंडिया (नॉर्थ अँड ईस्ट) व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन म्हणाले. तसेच, मॅकडोनाल्डच्या जुन्या भागीदारासोबत सुरू असलेल्या कायदेशीर वादाबद्दल विचारले असता सर्व समस्या आणि अडचणी मागे टाकून आम्ही आमचा व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहोत.

- 2020 मध्ये Mमॅकडोनाल्डने एमएमजी ग्रुपचे अध्यक्ष संजीव अग्रवाल यांची देशाच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागांतील ऑपरेशन्ससाठी नवीन भागीदार म्हणून निवड केली होती, त्यांचे जुने भागीदार विक्रम बक्षी यांच्याकडून 50 टक्के हिस्सा घेतला होता. तर, पश्चिम आणि दक्षिण भारतासाठी भागीदार वेस्टलाइफ ग्रुप आहे.

- याशिवाय, 2025 पर्यंत देशात निश्चित कालावधीसाठी निश्चित पेमेंटवर काम करणार्‍या गिग कर्मचार्‍यांची संख्या 1.1 कोटी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ग्लोबल जॉब ऑनलाइन प्लॅटफॉर्म  इन्डीडच्या अहवालानुसार, अधिकाधिक कंपन्या प्रकल्पाच्या आधारावर कर्मचार्‍यांना कामावर घेण्यास प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे गिग कामगारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

- अहवालानुसार, अर्थव्यवस्था दीर्घकाळातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक बदलांपैकी एक आहे आणि लोक गिग नोकऱ्या का निवडत आहेत, याचे कारण ते आपल्या जीवनशैलीशी जुळणारे आहे. गिग कामगारांना कंपन्यांकडून कामाच्या आधारे वेतन दिले जाते. याच्या मदतीने लोक हे देखील निवडू शकतात की त्यांना कधी आणि किती काम करायचे आहे.

Web Title: McDonald's will give jobs to five thousand persons in next three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.