Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘कोरोनाचे परिणाम रोखण्यासाठी उपाय करणार’

‘कोरोनाचे परिणाम रोखण्यासाठी उपाय करणार’

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:21 AM2020-02-20T03:21:22+5:302020-02-20T03:21:37+5:30

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की

'Measures to prevent corona effect', says nirmala sitharaman | ‘कोरोनाचे परिणाम रोखण्यासाठी उपाय करणार’

‘कोरोनाचे परिणाम रोखण्यासाठी उपाय करणार’

नवी दिल्ली : चीनमधील कोरोना विषाणूमुळे औषधी व अन्य वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका असून, त्यावर मात करण्यासाठी सरकार उपाय करणा आहे. त्यात सीमाशुल्कात कपात, परवानग्यांची गती वाढविणे यांचा समावेश आहे.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे औषधांचा पुरवठा विस्कळीत होऊ दिला जाणार नाही. चीनशी व्यापार असलेल्या २० उद्योगांचे प्रतिनिधी वित्तमंत्र्यांशी झालेल्या चर्चेला हजर होते. जीवनरक्षक औषधांच्या उत्पादनासाठी तसेच कर कमी करण्यासाठी काही कच्चा माल आयात करण्याची सूचना प्रतिनिधींनी केली. कच्च्या मालाच्या आयातीमुळे वाहतुकीच्या खर्चात बचत होईल.
नीती आयोगाने बुधवारी अनेक मंत्रालयांची बैठक बोलावली होती. तिथेही या विषयावर चर्चा झाली.
 

Web Title: 'Measures to prevent corona effect', says nirmala sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.