Join us

‘कोरोनाचे परिणाम रोखण्यासाठी उपाय करणार’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 3:21 AM

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की

नवी दिल्ली : चीनमधील कोरोना विषाणूमुळे औषधी व अन्य वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका असून, त्यावर मात करण्यासाठी सरकार उपाय करणा आहे. त्यात सीमाशुल्कात कपात, परवानग्यांची गती वाढविणे यांचा समावेश आहे.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे औषधांचा पुरवठा विस्कळीत होऊ दिला जाणार नाही. चीनशी व्यापार असलेल्या २० उद्योगांचे प्रतिनिधी वित्तमंत्र्यांशी झालेल्या चर्चेला हजर होते. जीवनरक्षक औषधांच्या उत्पादनासाठी तसेच कर कमी करण्यासाठी काही कच्चा माल आयात करण्याची सूचना प्रतिनिधींनी केली. कच्च्या मालाच्या आयातीमुळे वाहतुकीच्या खर्चात बचत होईल.नीती आयोगाने बुधवारी अनेक मंत्रालयांची बैठक बोलावली होती. तिथेही या विषयावर चर्चा झाली. 

टॅग्स :कोरोनानिर्मला सीतारामन