हैदराबाद : चालू वित्त वर्षात अन्य सर्वच क्षेत्रांच्या तुलनेत भारतातील औषधी क्षेत्राची कामगिरी चांगली राहिली असून, यंदा या क्षेत्राची निर्यात वृद्धी जवळपास दोन अंकी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या जवळपास जाणारी कामगिरी यंदाही होईल, असे दिसते.
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, औषधी क्षेत्राची निर्यात अन्य कुठल्याही क्षेत्रापेक्षा यंदा चांगली दिसून येत आहे. यंदा औषधी निर्यातीतील भारताचा निर्यात वाढीचा आकडा दोन अंकी असेल, असे दिसते. गेल्या महिन्यात या क्षेत्राने ८ टक्के निर्यात वाढ नोंदविली. इतर सर्वच क्षेत्रे घसरण आणि मंदीचा सामना करीत असताना असताना औषधी क्षेत्रात मात्र चांगली निर्यात होताना दिसत आहे. दोन अंकी वृद्धी नोंदविणे अवघड आहे, तरी अशक्य नाही, असे मला वाटत नाही.
बायोएशिया २0१७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पांडे यांनी ही माहिती दिली. औषधी क्षेत्राचा वृद्धीदर यंदा ८ ते १0 टक्के यादरम्यान कुठे तरी राहील, असे ते म्हणाले.
फार्माएक्सील या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वित्त वर्षात भारतीय औषधी क्षेत्राने १६.९ अब्ज डॉलरची निर्यात केली होती. वृद्धीदर ९.४४ टक्के होता. अमेरिकेत ५.७ अब्ज डॉलरची, तर आफ्रिकेत ३.३ अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली होती. २0१४-१५ मध्ये १५.४ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती.
पांडे यांनी सांगितले की, ब्रेक्झिटचा फारसा परिणाम औषधी निर्यातीवर झाल्याचे दिसत नाही. ब्रिटन आणि युरोपातील निर्यात स्थिर राहिली. सुरुवातीला काही परिणाम झाल्याचे दिसत होते. मात्र, आता निर्यात स्थिती स्थिर झाली आहे. गेल्या महिन्यात वाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे कल वाढीच्या दिशेने आहे, असे मला वाटते. (वृत्तसंस्था)
औषधी निर्यात दोन अंकी राहाणार
चालू वित्त वर्षात अन्य सर्वच क्षेत्रांच्या तुलनेत भारतातील औषधी क्षेत्राची कामगिरी चांगली राहिली असून, यंदा या क्षेत्राची निर्यात वृद्धी जवळपास दोन
By admin | Published: February 10, 2017 12:44 AM2017-02-10T00:44:41+5:302017-02-10T00:44:41+5:30