Lokmat Money > बिझनेस न्यूज > मध्यम, कमी उत्पन्न गटांची यंदा दिवाळी कमी खर्चाची

मध्यम, कमी उत्पन्न गटांची यंदा दिवाळी कमी खर्चाची

मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबे यंदा दिवाळी सणानिमित्त गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्के कमी खर्च करतील, असे उद्योग मंडळ असोचेमने केलेल्या पाहणीत म्हटले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2015 10:03 PM2015-11-09T22:03:25+5:302015-11-09T22:03:25+5:30

मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबे यंदा दिवाळी सणानिमित्त गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्के कमी खर्च करतील, असे उद्योग मंडळ असोचेमने केलेल्या पाहणीत म्हटले आहे.

Medium and low income group this Diwali low cost this year | मध्यम, कमी उत्पन्न गटांची यंदा दिवाळी कमी खर्चाची

मध्यम, कमी उत्पन्न गटांची यंदा दिवाळी कमी खर्चाची

नवी दिल्ली : मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबे यंदा दिवाळी सणानिमित्त गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्के कमी खर्च करतील, असे उद्योग मंडळ असोचेमने केलेल्या पाहणीत म्हटले आहे.
खाद्यान्नांच्या वाढलेल्या किमती, शिक्षणावरील वाढलेला खर्च व रोजगार बाजारातील मरगळ यामुळे ही कुटुंबे हा दिवाळसण कमी खर्चाचा करीत आहेत. ही पाहणी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे चंदीगढ व डेहराडून या मोठ्या शहरांत करण्यात आली. पाहणीत वाहन, जैव तंत्रज्ञान, बँकिंग, अर्थसेवा, विमा, ऊर्जा, एफएमसीजी, माहिती तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल व रियल इस्टेट क्षेत्रातील १६५० जणांची मते विचारात घेण्यात आली.
दिल्लीतील मध्यम व कमी उत्पन्न गटातील ६७ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, दैनंदिन खाद्यवस्तूंच्या किमतीत झालेली वाढ, शिक्षणावर होणारा मोठा खर्च आदी कारणांमुळे यावेळी सणानिमित्त कमी खर्च करण्यास भाग पडत आहे.

Web Title: Medium and low income group this Diwali low cost this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.