Join us

मध्यम, कमी उत्पन्न गटांची यंदा दिवाळी कमी खर्चाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2015 10:03 PM

मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबे यंदा दिवाळी सणानिमित्त गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्के कमी खर्च करतील, असे उद्योग मंडळ असोचेमने केलेल्या पाहणीत म्हटले आहे.

नवी दिल्ली : मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबे यंदा दिवाळी सणानिमित्त गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्के कमी खर्च करतील, असे उद्योग मंडळ असोचेमने केलेल्या पाहणीत म्हटले आहे.खाद्यान्नांच्या वाढलेल्या किमती, शिक्षणावरील वाढलेला खर्च व रोजगार बाजारातील मरगळ यामुळे ही कुटुंबे हा दिवाळसण कमी खर्चाचा करीत आहेत. ही पाहणी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे चंदीगढ व डेहराडून या मोठ्या शहरांत करण्यात आली. पाहणीत वाहन, जैव तंत्रज्ञान, बँकिंग, अर्थसेवा, विमा, ऊर्जा, एफएमसीजी, माहिती तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल व रियल इस्टेट क्षेत्रातील १६५० जणांची मते विचारात घेण्यात आली. दिल्लीतील मध्यम व कमी उत्पन्न गटातील ६७ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, दैनंदिन खाद्यवस्तूंच्या किमतीत झालेली वाढ, शिक्षणावर होणारा मोठा खर्च आदी कारणांमुळे यावेळी सणानिमित्त कमी खर्च करण्यास भाग पडत आहे.