Join us

भारतातील तिसरे श्रीमंत कोण आहेत माहितेय का? २५८००० कोटी रुपयांची आहे संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 2:10 PM

वयाच्या ४७ व्या वर्षी, शापूर मिस्त्री यांनी २०१२ मध्ये त्यांच्या वडिलांकडून अब्जावधी डॉलर्सच्या समूह एसपी ग्रुपची सूत्रे हाती घेतली.

आपल्या देशात श्रीमंतीच्या यादीत एक आणि दोन नंबरला उद्योगपती मुकेश अंबानी आणि उद्योगपती गौतम अदानी यांची नावं असतात. पण, आपल्याला तिसरं नावं कोणाचं असतं. हे अनेकांना माहिती नसतं. आज आपण देशातील श्रीमंताच्या यादीतील तिसऱ्या नावं कोणाचं असतं याची माहिती घेणार आहोत. तिसरं नाव असतं ते म्हणजे एसपी समुहाचे प्रमुख शापूर मिस्त्री यांचं. त्यांच्या शापूरजी पालोनजी समुह १५७ वर्ष जुना आहे. 

माऊंट एव्हरेस्ट चढणं खिशावर पडणार भारी, आता परदेशी लोकांना द्यावं लागणार १५००० डॉलर्सचं शुल्क

मिस्त्री कुटुंब टाटांच्या जवळचे आहेत आणि टाटा आणि मिस्त्री कुटुंबांनी गेल्या काही वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये भागीदारीही केली आहे. शापूर हे एका प्रतिष्ठित कुटुंबातून आले आहेत त्यांचे वडील पालोनजी मिस्त्री आणि भाऊ सायरस मिस्त्री. सायरस मिस्त्री यांचे सप्टेंबर २०२२ मध्ये एका दुःखद कार अपघातात निधन झाले. 

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकाने आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि भारतातील माजी सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्यानंतर भारतातील तिसरा श्रीमंत व्यक्ती म्हणून शापूर मिस्त्री यांचा यादीत समावेश केला आहे. शापूर मिस्त्री यांच्या मुंबई-मुख्यालयातील समूहाला अभियांत्रिकी आणि बांधकाम, रिअल इस्टेट, शिपिंग, कापड, गृहोपयोगी उपकरणे, जैवतंत्रज्ञान इत्यादींमध्ये वैविध्यपूर्ण रूची आहे. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी, टाटा सन्सचा SP ग्रुप हा सर्वात मोठा भागधारक आहे.

मिस्त्री नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिले आहेत. वयाच्या ४७ व्या वर्षी शापूर यांनी २०१२ मध्ये अध्यक्ष म्हणून वडिलांकडून एसपी ग्रुपची सूत्रे हाती घेतली. ते आधीपासून एमडी पदावर कार्यरत होते.तेव्हाच्या अहवालानुसार, एसपी ग्रुपमध्ये तेव्हा त्यांना "मोठे रणनीतीकार" म्हणून संबोधले.

५८ वर्षीय शापूर मिस्त्री सध्या भारतातील तिसरे आणि जगातील ४७ व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३१.१ अब्ज डॉलर म्हणजेच रु. २५८००० कोटींहून अधिक आहे. शापूर मिस्त्री यांनी या वर्षात त्यांच्या संपत्तीत ३.३४ अब्ज डॉलरची भर घातली आहे.

टॅग्स :व्यवसाय