Lokmat Money > बिझनेस न्यूज > AIR INDIA मध्ये 'मेगा भरती'; 'ले ऑफ'च्या काळात ५ हजार तरुण 'टाटा'संगे करणार 'टेक ऑफ'

AIR INDIA मध्ये 'मेगा भरती'; 'ले ऑफ'च्या काळात ५ हजार तरुण 'टाटा'संगे करणार 'टेक ऑफ'

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 06:37 PM2023-02-24T18:37:23+5:302023-02-24T18:37:50+5:30

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

Mega recruitment in AIR INDIA more than 5000 pilots and cabin crew chance to work with tata air india in this lay off time | AIR INDIA मध्ये 'मेगा भरती'; 'ले ऑफ'च्या काळात ५ हजार तरुण 'टाटा'संगे करणार 'टेक ऑफ'

AIR INDIA मध्ये 'मेगा भरती'; 'ले ऑफ'च्या काळात ५ हजार तरुण 'टाटा'संगे करणार 'टेक ऑफ'

Air India Recruitment : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण एअर इंडियाने २०२३ मध्ये ४२०० पेक्षा जास्त केबिन क्रू प्रशिक्षणार्थी आणि ९०० वैमानिकांची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. एअर इंडिया आणखी काही नवीन विमाने खरेदी करणार आहे आणि आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कामकाजाचा झपाट्याने विस्तार करण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी कंपनी मोठी पावलं उचलत आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामुळे ‘महाराजा’ पुन्हा उंच भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. 

या महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियाने त्यांच्या विस्ताराच्या योजनेसाठी बोईंग आणि एअरबसकडून ४७० विमाने खरेदी करण्याची मेगा ऑर्डर दिल्याची घोषणा केली होती. ३६ विमाने भाड्याने घेण्याची योजना त्यांनी आधीच जाहीर केली आहे ज्यापैकी दोन B777-200LR आधीच ताफ्यात सामील झाली आहेत.

प्रशिक्षण देणार
देशभरातून भरती होणाऱ्या केबिन क्रूना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये प्रदान करणारा १५-आठवड्याचा कार्यक्रम पार पाडावा लागेल आणि त्यांना भारतीय आदरातिथ्य तसंच टाटा समूह संस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण देण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल. प्रशिक्षण कार्यक्रमात मुंबईत एअरलाईन्सच्या प्रशिक्षण सुविधेसोबत उड्डाणांमधील व्यापक कक्षा आणि इन फ्लाईट प्रशिक्षण सामील असेल.

११०० जणांना प्रशिक्षण
एअर इंडियाने मे २०२२ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान १९०० हून अधिक केबिन क्रू ची नियुक्ती केली आहे. गेल्या सात महिन्यांत १,१०० हून अधिक केबिन क्रू प्रशिक्षित केले गेले आहेत आणि गेल्या तीन महिन्यांत सुमारे ५०० केबिन क्रू उड्डाणासाठी सज्ज झाले आहेत.

Web Title: Mega recruitment in AIR INDIA more than 5000 pilots and cabin crew chance to work with tata air india in this lay off time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.