मुंबई - देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असा लौकिक असलेल्या एलआयसीमध्ये तब्बल 24 वर्षांनंतर मोठी भरती निघाली आहे. एलआयसीमध्ये 'असिस्टंट' (सहायक) पदासाठी ही भरती जाहीर झाली असून, या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून सुमारे आठ हजार जागा भरल्या जाणार आहेत.
जवळपास 24 वर्षांनंतर होत असलेल्या असिस्टंट या भरतीसाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे. कुठल्याही विषयामधील पदवीधर हा ही परीक्षा देण्यासाठी पात्र असेल. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षे आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये सुट देण्यात आलेली आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षा असे परीक्षेचे स्वरूप राहील. प्रश्नपत्रिकेमध्ये बहुपर्यायी प्रश्न असतील. तसेच ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची असेल. परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2019 असून, इच्छूक उमेदवारांना www.licindia.in/careers या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.
या परीक्षेसाठी राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि गोव्यातील पणजी ही परीक्षा केंद्रे असतील. परीक्षेची तारीख नंतर जाहीर होईल.