Lokmat Money > बिझनेस न्यूज > अँटिग्वामध्ये अपहरण, मानसिक आजारानंतर मेहुल चोक्सीचा आणखी एक दावा; डॉक्टरचं सर्टिफिकेटही जोडलं

अँटिग्वामध्ये अपहरण, मानसिक आजारानंतर मेहुल चोक्सीचा आणखी एक दावा; डॉक्टरचं सर्टिफिकेटही जोडलं

Mehul Choksi: पीएनबी घोटाळ्यात वाँटेड असलेल्या मेहुल चोक्सीने यापूर्वी अँटिग्वामध्ये अपहरण, मानसिक आजार असे अनेक दावे केले होते. यावेळी मेहुलने आपल्याला ब्लड कॅन्सर असल्याचे सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:52 IST2025-02-28T14:49:36+5:302025-02-28T14:52:03+5:30

Mehul Choksi: पीएनबी घोटाळ्यात वाँटेड असलेल्या मेहुल चोक्सीने यापूर्वी अँटिग्वामध्ये अपहरण, मानसिक आजार असे अनेक दावे केले होते. यावेळी मेहुलने आपल्याला ब्लड कॅन्सर असल्याचे सांगितले आहे.

mehul choksi has told a mumbai court that he is suffering from blood cancer | अँटिग्वामध्ये अपहरण, मानसिक आजारानंतर मेहुल चोक्सीचा आणखी एक दावा; डॉक्टरचं सर्टिफिकेटही जोडलं

अँटिग्वामध्ये अपहरण, मानसिक आजारानंतर मेहुल चोक्सीचा आणखी एक दावा; डॉक्टरचं सर्टिफिकेटही जोडलं

Mehul Choksi : भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशी पळून गेलेल्या उद्योगपतींभोवतीचा फास आता सरकारने आवळला आहे. यापूर्वी नीरव मोदी आणि विजय माल्ल्या यांची हजारो कोटी रुपयांची संपत्ती बँकेंनी जप्त केली आहे. विजय माल्ल्याची संपत्ती विकून विविध बँकांना १४ हजार कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. याशिवाय निरव मोदीचीही संपत्ती विकून १०५३ कोटी रुपये वसुल करण्यात आले. यात आता पुढचा नंबर मेहुल चोक्सीचा आहे. चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १३,५०० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात मेहुल चोक्सीने मुंबईतील एका न्यायालयाला वेगळाच दावा केला आहे.

मेहुल चोक्सीला रक्ताचा कॅन्सर
पंजाब नॅशनल बँक आर्थिक फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीवर मुंबईतील एका न्यायालयात सुनावणी चालू आहे. या सुनावलीला तो उपस्थित राहण्याच्या परिस्थितीत नसल्याचे त्याने कळवले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केलेल्या एका विशेष याचिकेत मेहुलने ही विनंती केली आहे. त्याला दूर्मिळ लिम्फोसाइटिक ल्युकेमिया अर्थात रक्ताचा कर्करोग झाल्याचं त्याने सांगितले आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार, मेहुल चोक्सीने त्याच्या याचिकेत त्याचा वैद्यकीय अहवालही जोडला आहे. यासोबतच मेहुलने अँटवर्प, बेल्जियम येथील एका डॉक्टरचे मतही शेअर केले आहे, ज्यामध्ये मेहुल सध्या १०० टक्के प्रवास करण्याच्या स्थितीत नसल्याचे नमूद केले आहे. ईटीच्या हवाल्याने एका अधिकाऱ्याने सांगितले की, मेहुल चोक्सीने त्याच्या देशात परतावे कारण तेथे त्याच्यावर उपचार करू शकणारे चांगले डॉक्टर आहेत.

मेहुलवर बेल्जियममध्ये उपचार सुरू
यापूर्वी मेहुलने दावा केला होता की त्याचे अँटिग्वामध्ये अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर तो मानसिक आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहे. एवढेच नाही तर भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही मेहुलने केला होता. पंजाब नॅशनल बँकेची सुमारे १३,४०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा मोस्ट वाँटेड गुन्हेगारांपैकी एक मेहुल आता अँटिग्वाचा नागरिक आहे. सध्या तो कॅन्सरच्या उपचारासाठी बेल्जियममध्ये राहत आहे. दुसरीकडे, नीरव मोदी जवळपास ६ वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात आहे. भारत या बँक घोटाळ्याची चौकशी करत असून त्यादृष्टीने एजन्सींनी चोक्सीला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.

चोक्सीच्या मालमत्तांचा लिलाव करण्यास कोर्टाची परवानगी
बँकांची कोट्यावधी रुपयांची फवसणूक करत परदेशात पळ काढणाऱ्या मेहुल चोक्सीला पीएमएलए कोर्टाने दणका दिलाय. मेहुल चोक्सीशी  संबंधित २५६५ कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी पीएमएलए कोर्टानं दिलेली आहे. मेहुल चोक्सीची १२५ कोटी रुपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

Web Title: mehul choksi has told a mumbai court that he is suffering from blood cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.