मुंबई/ नवी दिल्ली : पीएनबी घोटाळाप्रकरणी गीतांजलीचा मेहुल चोक्सी याची हैदराबादच्या एसईझेडमधील १२०० कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याशिवाय चोक्सी व नीरव मोदीच्या ९४.५२ कोटींच्या म्युच्युअल फंड्स व शेअर्सवरही ईडीने टाच आणली आहे.
ईडीने नीरव मोदीच्या ९ लक्झरी कारही जप्त केल्या आहेत. यातील ८६.७२ कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड्स व शेअर चोक्सीचे तर उरलेले मोदीचे आहेत. मोदीच्या रोल्सराइस घोस्ट, मर्सिडीज बेंझ, पोर्शे पनामेरा, होंडा, टोयोटा फॉर्च्युनर व इनोव्हा या कार जप्त केल्या आहेत.
अंबानीला माहीत होते
मोदीचा निकटवर्तीय विपुल अंबानी याला फसव्या लेटर आॅफ अंडरटेकिंगची माहिती होती. या लेटरसाठी अंबानीच्या कार्यालयातून अर्ज करण्यात आला होता, असे सीबाआयने म्हटले आहे.
सीएंची भूमिका काय?
कंपनी कायद्यानुसार, अशा प्रकरणांत लेखापरीक्षकांची (सीए) महत्त्वाची जबाबदारी आहे. कॉर्पोरेट खाते सुरळीत आहेत याची खात्री त्यांनी करायची असते. शंकांचे निरसन न झाल्यास, त्यावर स्वाक्षरी न करण्याचा पर्याय त्यांच्याकडे असतो. सीएशी व्यवस्थापन नसल्यास ते प्रकरण आॅडिट समितीकडे यायला हवे. कर्मचारी किंवा अधिकाºयांकडून फसवणुकीचा प्रकार झाल्यास लेखापरीक्षक ते सरकारला कळवू शकतात. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लेखापरीक्षकांच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली आहे.
मेहुल चोक्सीची १२०० कोटींची मालमत्ता जप्त, मोदीच्याही संपत्तीवर टाच
पीएनबी घोटाळाप्रकरणी गीतांजलीचा मेहुल चोक्सी याची हैदराबादच्या एसईझेडमधील १२०० कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:54 AM2018-02-23T06:54:08+5:302018-02-23T06:54:22+5:30