Join us

फ्लिपकार्ट, महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार; स्थानिक कारागिरांच्या विकासाला मिळणार चालना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 9:12 PM

Flipkart : महाराष्ट्रात एमएसएसआयडीसी आणि एमएसकेव्हीआयबीच्या सामंजस्य करारामुळे राज्यातील स्थानिक कारागिर, विणकर आणि छोट्या उद्योगांना आपली वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने देशातील लाखो ग्राहकांसमोर आणता येतील

ठळक मुद्देगुरूवारी करण्यात आल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्यारोजगाराच्या संधी निर्माण होती, अदिती तटकरे यांचा विश्वास

फ्लिपकार्ट या भारतातील अंतरदेशीय ई-कॉमर्स बाजारपेठेने महाराष्ट्र  लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित (एमएसएसआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ    (एमएसकेव्हीआयबी) यांच्यादरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील स्थानिक कारागिर, विणकर, हस्तकलाकार आणि एमएसएमईना ई-कॉमर्सच्या विश्वात आणलं असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. फ्लिपकार्ट समर्थ या कंपनीच्या प्रमुख उपक्रमात स्थानिक कारागीर आणि त्यांच्या उपक्रमांचा समावेश करण्यासाठीच्या या सामंजस्य करारावर मंत्री सुभाष देसाई आणि राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

फ्लिपकार्ट समर्थ उपक्रमाअंतर्गत झालेल्या या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील स्थानिक कारागिर, विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांना खादी, पैठणी साड्या, लाकडाची खेळणी, हाताने बनवलेल्या वस्तू, दागिने, कागदी वस्तू, पर्स आणि हस्तकलेच्या इतर वैशिष्ट्यपूर्ण वस्तू देशातील लाखो ग्राहकांसमोर मांडता येतील. शिवाय यातून सरकारच्या 'Vocal for Local' या उद्देशालाही बळकटी मिळणार आहे. फ्लिपकार्ट समर्थ हा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आहे. कुशल स्थानिक कारागीर समुदायाला फ्लिपकार्ट मार्केटप्लेसवर परिणामकारक, पारदर्शक आणि योग्य मूल्यासहित व्यवसायास बळकटी आणण्यासाठी या उपक्रमातून सहाय्य केले जाईल. “राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात आणि राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात एसएसएमई क्षेत्राचा मोठा वाटा आहे. कोविड-१९ नंतरच्या काळात आम्ही हस्तकला आणि हातमाग उद्योगाला सक्षम करण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या  सामंजस्य कराराद्वारे क्रांतीकारी पावले उचललेली आहेत,” असं मत असं मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं. 

रोजगाराच्या संधी निर्माण होतील“अशा प्रकारच्या सामंजस्य करारामुळे खादी आणि ग्रामोद्योग, हस्तकला आणि हातमाग उद्योग क्षेत्राच्या वाढीला चालना मिळेल आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील,” असा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. 

“एमएसएसआयडीसी आणि एमएसकेव्हीआयबीसोबत भागीदारी करून स्थानिक कारागीर, विणकर आणि लघु उद्योगांचा सामाजिक आणि व्यावसायिक विकास साधत या व्यासपीठावर राज्याचा संपन्न वारसा मांडण्याची ही संधी मिळाल्याबद्दल आम्ही उत्सुक आहोत. आमच्या व्यासपीठावर खरेदी करणाऱ्या ३०० दशलक्ष ग्राहकांची राष्ट्रीय बाजारपेठ देशभरातील एमएसएमईना उपलब्ध करून देण्यात ई-कॉमर्स फार महत्त्वाची भूमिका बजावते. फ्लिपकार्ट समर्थ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. यात व्यवसायांना आवश्यक पाठबळ मिळते आणि अशा अधिकाधिक स्थानिक व्यवसायांना ई-कामॅर्सचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू अशी आम्हाला आशा आहे.” अशी प्रतिक्रिया यावेळी फ्लिपकार्ट समूहाचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजनीश कुमार यांनी दिली. 

टॅग्स :फ्लिपकार्टमहाराष्ट्रकोरोना वायरस बातम्याअदिती तटकरेसुभाष देसाई