Lokmat Money > बिझनेस न्यूज > बासमती तांदळावरील MEP कमी केला, निर्यात वाढली; दरात १० टक्के वाढ होण्याची शक्यता

बासमती तांदळावरील MEP कमी केला, निर्यात वाढली; दरात १० टक्के वाढ होण्याची शक्यता

जागतिक बाजारातून मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने आठवडाभरातच प्रतिक्विंटल दरात ७०० रुपयांची वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 11:37 AM2023-11-04T11:37:20+5:302023-11-04T11:37:58+5:30

जागतिक बाजारातून मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने आठवडाभरातच प्रतिक्विंटल दरात ७०० रुपयांची वाढ झाली आहे.

MEP on basmati rice reduced, exports up; There is a possibility of a 10 percent increase in the rate | बासमती तांदळावरील MEP कमी केला, निर्यात वाढली; दरात १० टक्के वाढ होण्याची शक्यता

बासमती तांदळावरील MEP कमी केला, निर्यात वाढली; दरात १० टक्के वाढ होण्याची शक्यता

गेल्या आठवड्यात भारताने बासमती तांदळाची किमान निर्यात किंमत  (MEP) १२०० डॉलर प्रति टन वरून ९५० डॉलर पर्यंत कमी केल्यानंतर, तुर्कस्तानमधील अनेक मोठे खरेदीदार बासमती तांदूळ खरेदी करण्यासाठी भारतात आले आहेत, परिणामी निर्यात बाजारात किंमती ९७५-१००० डॉलर प्रति टन पर्यंत वाढल्या आहेत. हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या बासमती भात पिकासाठी प्रति क्विंटल ३९०० रुपये मिळत आहेत.

भारतीय लसणामुळे ‘ड्रॅगन’ला ठसका; भारताने चीनचे टेंशन वाढविले

जागतिक बाजारपेठेतील मोठ्या मागणीमुळे एका आठवड्यात ७०० रुपये प्रति क्विंटलची वाढ झाली आहे. आतापासून एका महिन्यात  किंमती आणखी १०% वाढतील अशी अपेक्षा आहे.

बासमती तांदळाच्या एकूण १.७ मिलियन हेक्टर क्षेत्रापैकी १५०९ जातीचा वाटा सुमारे ४०% आहे. २०२२-२३ मध्ये बासमती तांदळाची निर्यात ४.५ मिलियन होती, याचे मूल्य ३८,५२४.११ कोटी रुपये होते, आखाती देश हे प्रमुख खरेदीदार होते. भारतात उत्पादित बासमती तांदळाच्या ८०% पेक्षा जास्त निर्यात केली जाते.

“प्रति टन १२०० डॉलरच्या खाली असलेल्या किमतीमुळे जुने करार रद्द करण्यात आले होते. बासमती निर्यातदार आणि ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय सेटिया म्हणाले की, नवीन ऑर्डर येत आहेत आणि तुर्कस्तानमधून मोठे खरेदीदार बासमती तांदूळ चांगल्या प्रमाणात घेण्यासाठी भारतात येत आहेत.

Web Title: MEP on basmati rice reduced, exports up; There is a possibility of a 10 percent increase in the rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.