Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील १0 सरकारी बँकांचे विलीनीकरण १ एप्रिल रोजी?

देशातील १0 सरकारी बँकांचे विलीनीकरण १ एप्रिल रोजी?

देशात राहतील १0 राष्ट्रीयीकृत बँका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:25 AM2020-02-20T03:25:04+5:302020-02-20T03:25:26+5:30

देशात राहतील १0 राष्ट्रीयीकृत बँका

 Merger of 10 government banks in the country on April 7? | देशातील १0 सरकारी बँकांचे विलीनीकरण १ एप्रिल रोजी?

देशातील १0 सरकारी बँकांचे विलीनीकरण १ एप्रिल रोजी?

नवी दिल्ली : देशातील १0 सरकारी बँकांचे विलिनीकरण १ एप्रिल रोजी होण्याची शक्यता असून, त्यामुळे सरकारी बँकांची संख्या केवळ १२ राहील. या विलिनीकरणाची घोषणा ३0 आॅगस्ट रोजी केली होती. याबाबत अधिसूचना या आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यांचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण होईल आणि इलाहाबाद बँकेचे विलीनीकरण इंडियन बँकेत केले जाईल. युनियन बँकेमध्ये आंध्र बँक व कॉपोर्रेशन बँकेचे विलीनीकरण होणार आहे.

या विलीनीकरणानंतर देशात स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, इंडियन ओवरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक आॅफ महाराष्ट्र व यूको बँक शिल्लक राहतील. याआधी २0१७ साली स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये स्टेट बँक आॅफ पटियाळा, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, तसेच भारतीय महिला बँक विलीन करण्यात आली होती.
 

Web Title:  Merger of 10 government banks in the country on April 7?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.