Lokmat Money > बिझनेस न्यूज > आणखी बँकांचे विलीनीकरण करणार

आणखी बँकांचे विलीनीकरण करणार

पाच सरकारी बँकांचे एसबीआयमध्ये यशस्वीरीत्या विलीनीकरण केल्यानंतर, आणखी काही सरकारी बँकांचे

By admin | Published: May 1, 2017 01:22 AM2017-05-01T01:22:28+5:302017-05-01T01:22:28+5:30

पाच सरकारी बँकांचे एसबीआयमध्ये यशस्वीरीत्या विलीनीकरण केल्यानंतर, आणखी काही सरकारी बँकांचे

Merging more banks | आणखी बँकांचे विलीनीकरण करणार

आणखी बँकांचे विलीनीकरण करणार

नवी दिल्ली : पाच सरकारी बँकांचे एसबीआयमध्ये यशस्वीरीत्या विलीनीकरण केल्यानंतर, आणखी काही सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्याचा विचार सरकार करीत आहे. विलीनीकरण प्रक्रियेतून जागतिक पातळीवरील बँकांच्या आकाराच्या मोजक्याच मोठ्या बँका तयार करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आणखी काही बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. त्यासाठी ल्ांवकरच एक बोर्ड स्टडी हाती घेण्यात येणार आहे. सरकारच्या मालकीच्या २१ बँकांचे कसे विलीनीकरण करता येऊ शकेल, याचा अभ्यास त्यात केला जाणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, विलीनीकरण करताना प्रादेशिक संतुलन, भौगोलिक विस्तार, आर्थिक भार आणि सुलभ मनुष्यबळ हस्तांतरण या बाबी लक्षात घ्यावा लागतात. अगदीच कमजोर बँक मजबूत बँकेत विलीन करता येऊ शकत नाही. कारण त्यामुळे मजबूत बँकच कमजोर होऊ शकते.
अधिकाऱ्याच्या मते, पंजाब आणि सिंध बँकेचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण केले जाऊ शकते. बँक आॅफ बडोदा दक्षिणेतील इंडियन ओव्हरसीज बँकेचे अधिग्रहण करू शकते.

Web Title: Merging more banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.