फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या कंपन्या चालवणाऱ्या मेटाचा मालक मार्क झुकेरबर्गचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. चर्चेचं कारण म्हणजे त्याच्या मनगटावर असलेलं घड्याळ. या व्हिडिओमध्ये मार्क झुकेरबर्गनं ९ लाख डॉलर्सचं लिमिटेड एडिशन वॉच परिधान केलं आहे. या व्हिडिओमध्ये झुकेरबर्ग अमेरिकेतील आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग सिस्टीम बंद करण्याच्या कंपनीच्या निर्णयाची सविस्तर माहिती देताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोणत्या कंपनीचं घड्याळ?
मेटा प्लॅटफॉर्मचे चेअरमन झुकेरबर्ग यानं डाव्या हातात Greubel Forsey ‘Hand Made 1’ घड्याळ परिधान केलं होतं. मंगळवारी कंपनीनं हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला होता.
हे अतिशय दुर्मिळ आणि महागडे घड्याळ आहे. ग्रीबेल फोर्सी वर्षाला फक्त एक किंवा दोन हँडमेड घड्याळ तयार करते. कर वगळल्यास या घड्याळाची किंमत ९,९५,५०० डॉलर्स आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर मेटाच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मार्क झुकेरबर्ग गेल्या काही काळापासून मेकॅनिकल स्विच वॉच घालत आहे. ज्यावरून त्यांला या घड्याळ्यांची किती आवड आहे हे दिसून येतंय. यापूर्वी त्याच्या हातात Patek Philippe आणि FP Journe ची घड्याळंही दिसली होती.
Greubel Forsey ठराविकच घड्याळं बनवते
Greubel Forsey ही प्रीमियम वॉच कंपनी आहे. त्यांची घड्याळं खूप महाग असल्यानं त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत नाही. पण अब्जाधीशांमध्ये या कंपनीनं विशेष स्थान निर्माण केले आहे. Greubel Forsey वर्षाला फक्त काहीशे घड्याळं तयार करते. झुकेरबर्गनं परिधान केलेल्या मॉडेलचे बहुतांश भाग कंपनीने बनवले होते.