Join us

CCI Penalty on Meta : मार्क झुकेरबर्गच्या कंपनीला भारतात ₹213 कोटींचा दंड; जाणून घ्या प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 09:13 IST

CCI Slaps Penalty On Meta: फेसबूकची मूळ कंपनी Meta वर भारतीय स्पर्धा आयोगाने ही कारवाई केली आहे.

Fine on Meta : फेसबुकची मूळ कंपनी Meta चे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zukerberg) यांना भारतात मोठा दणका बसला आहे. भारतीय स्पर्धा आयोग, म्हणजेच CCI ने मेटाला 213.14 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी लागू करणे आणि युजरचा डेटा चोरल्याच्या आरोपावरून ही दंडात्म कारवाई करण्यात आली आहे. 

सीसीआयने ठोठावला दंडआज प्रत्येक मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेटमध्ये व्हॉट्सॲप आहे. या अॅपचा वापर झपाट्याने वाढला आहे. पण, आता हाच प्लॅटफॉर्म कंपनीचे मालक मार्क झुकेरबर्गला धक्का देणारा ठरला आहे. व्हॉट्सअॅपच्या संबंधित गोपनीयता धोरणाचा गैरवापर केल्याच्या आरोपांमुळे भारतातील सीसीआयने मेटाला 213.14 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

आपल्या प्रभावाचा गैरवापर भारतीय स्पर्धा आयोगाच्या आदेशानुसार, मेटावर गोपनीय माहिती चोरल्याच्या आरोपासोबतच, कंपनीच्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे. त्यामुळेच हा एवढा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. आदेशानुसार, व्हॉट्सॲपचे 2021 गोपनीयता धोरण कसे लागू केले गेले, युजरचा डेटा कसा मिळवून इतर कंपन्यांना दिला, याचा तपशील आदेशात आहे.

दंडासोबत हे निर्बंधही घातलेही बाब गांभीर्याने घेत CCI ने मेटावर केवळ दंडच लावला नाही, तर व्हॉट्सॲपला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जमा केलेला डेटा इतर कंपन्यांसोबत शेअर न करण्याचे आदेश दिले आहेत. व्हॉट्सॲप पाच वर्षांपर्यंत युजरचा डेटा कोणाशीही शेअर करू शकणार नाही. विशेष म्हणजे, सध्या भारतात व्हॉट्सॲपचे 50 कोटींहून अधिक युजर्स आहेत. ही संख्या जगभरातील अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.

टॅग्स :मार्क झुकेरबर्गफेसबुकमेटाभारततंत्रज्ञान