Meta Layoff 2023: जागतिक मंदीमुळे जगभरात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. अॅमेझॉन, ट्विटर, फेसबुक या कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांची कपात केली असून आता फेसबुक (Facebook) दुसऱ्यांदा कपात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्मने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली असून यावेळी कंपनी पुन्हा १,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची तयारी करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवू शकते, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या काही लोकांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही फेसबुकने (Facebook) अनेक कर्मचाऱ्यांना कमी केले होते, १३ टक्के कर्मचाऱ्यांना कमी केले होते. त्यांना कंपनीतून बाहेर काढले होते. काही महिन्यांपूर्वी मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानंतरही आता पुन्हा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला हजारो लोकांना बाहेर काढण्याची तयारी करत आहे. कंपनी पुन्हा आपले आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.
Meta च्या जाहिरातींच्या कमाईत घट झाली आहे, ज्यामुळे कंपनीने व्हर्च्युअल रिअॅलिटी प्लॅटफॉर्म Metaverse कडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.