Meta Layoff : जगातील अनेक विकसित देशांमध्ये मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदर कपात केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा दिसत नाही. टेक क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांनी नोकर कपात जाहीर केली आहे. मेटा कंपनीने इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि रिअॅलिटी लॅबसह अनेक विभागांमधील कर्मचाऱ्यांना नारळ देण्यास सुरुवात केली आहे.
कंपनीत काही बदल केले जात आहे. दीर्घकालीन धोरणात्मक उद्दिष्टे आणि स्थान रणनितीत ताळमेळ बसवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये काही टीम्सना वेगवेगळ्या ठिकाणी हलवणे जाणार असून काही कर्मचाऱ्यांची भूमिका बदलण्यात येणार आहे. आम्ही प्रभावित कर्मचाऱ्यांना इतर संधी शोधण्यासाठी प्रयत्न करू, असं मेटाच्या निवेदनात म्हटले आहे. मेटा किती कर्मचाऱ्यांची छाटणी करणार आहे, हे अद्याप उघड केले नाही. पण, कमी कर्मचाऱ्यांना काढणार असल्याचे म्हटले आहे.
लॉस एंजेलिस कार्यालयातही कर्मचारी कपातमेटाने अलीकडेच त्यांच्या लॉस एंजेलिस कार्यालयात सुमारे २ डझन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन जेवणाच्या क्रेडिटचा गैरवापर केल्यामुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येकाला जेवणासाठी २५ यूएस डॉलर दिले जात होते. मात्र, या क्रेडिटचा वापर खाद्यपदार्थ सोडून इतर कारणांसाठी केल्याचे उघड झाल्याने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. या कंपन्यांमध्ये अनेक भारतीय कर्मचारीही कामाला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही याचा परिणाम होऊ शकतो.
सॅमसंगमध्ये मोठी कर्मचारी कपातयापूर्वी सॅमसंग कंपनीनेही जगभरातील त्यांच्या कार्यालयातील अनेका लोकांना कामावरुन काढून टाकले आहेत. याचा फटका भारतीय कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. भारतात असलेल्या युनिटमध्येही सॅमसंग कपात करणार असल्याचे बोलले जात आहे. सॅमसंगने मात्र ही नियमित प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे.