Lokmat Money > बिझनेस न्यूज > आर्थिक साक्षरतेसाठी एमफिन अ‍ॅप

आर्थिक साक्षरतेसाठी एमफिन अ‍ॅप

ग्रामीण भागातील लोकांना, खासकरून महिलांना आर्थिक व्यवहारांची आणि त्यांच्या अधिकारांची माहिती व्हावी यासाठी एमफिन कनेक्ट हे अ‍ॅप लाँच

By admin | Published: April 26, 2017 12:53 AM2017-04-26T00:53:33+5:302017-04-26T00:53:33+5:30

ग्रामीण भागातील लोकांना, खासकरून महिलांना आर्थिक व्यवहारांची आणि त्यांच्या अधिकारांची माहिती व्हावी यासाठी एमफिन कनेक्ट हे अ‍ॅप लाँच

Mfin app for financial literacy | आर्थिक साक्षरतेसाठी एमफिन अ‍ॅप

आर्थिक साक्षरतेसाठी एमफिन अ‍ॅप

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील लोकांना, खासकरून महिलांना आर्थिक व्यवहारांची आणि त्यांच्या अधिकारांची माहिती व्हावी यासाठी एमफिन कनेक्ट हे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स नेटवर्क (एमफिन) या संघटनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपचे दिल्लीत झालेल्या ‘मायक्रोफायनान्स इन एशिया-ए-मोझियाक’ या परिषदेत अनावरण करण्यात आले. या वेळी खासदार मीनाक्षी लेखी, सिडबीचे सहव्यवस्थाकीय संपादक मनोज मित्तल उपस्थित होते.
सूक्ष्मवित्त संदर्भात ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलीच परिषद आहे. या परिषदेत एमफिनच्या सीईओ रत्ना विश्वानाथन म्हणाल्या की, जे लोक बँकिंग क्षेत्रापासून दूर आहेत अशांना वित्तीय सेवा देण्यात सूक्ष्मवित्त संस्थांची महत्त्वाची भूमिका असते. अशा लोकांना आर्थिक साक्षर करणे गरजेचे आहे. एमफिन कनेक्ट हे अ‍ॅप त्यासाठी मोलाची कामगिरी बजावेल. हे अ‍ॅप मराठी आणि हिंदीसह सहा भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातून त्यांना कर्ज, परतफेड, व्याजदर आणि खातेदारांचे अधिकार यासंबंधी माहिती मिळेल.

Web Title: Mfin app for financial literacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.