मुंबई : कुठल्याही तारणाशिवाय कर्ज देणाऱ्या सूक्ष्म वित्त संस्थांचा (एमएफआय) सध्या जोमाने विस्तार होत आहे. अशा सर्वाधिक २६ संस्था महाराष्टÑात आहेत. यांच्या कर्जदारांच्या संख्येत दरवर्षी २५ टक्के वाढ होत आहे. ‘आर्थिक सर्वसमावेशकता’ यामध्ये एमएफआयची भूमिका अति महत्त्वाची असेल, असे मत संस्थांच्या संघटनेचे सीईओ हर्ष श्रीवास्तव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांतर्गत बिगर बँकिंग वित्त संस्था (एनबीएफसी) कार्यरत असतात. एनबीएफसी सहा प्रकारच्या असतात. एमएफआय हा त्यापैकी एक प्रकार आहे. यासंदर्भात श्रीवास्तव म्हणाले, देशभरात सध्या ६५ एमएफआय आहेत. त्यापैकी महाराष्टÑातील २६ संस्थांनी आतापर्यंत ४,५७७ कोटींचे कर्ज दिले आहे. यातील ९ कोटी कर्जदारांपैकी ९८ टक्के महिला आहेत. महाराष्टÑात ज्या भागात आजवर सहकारी संस्था सक्षम होत्या, तेथील महिला, महिलांचे बचत गट, शेतकºयांच्या पत्नी यांनी सहकारी संस्थांऐवजी या एमएफआयकडून कर्ज घेणे सुरू केले आहे.
एमएफआय हे मोठ्या वित्त संस्था किंवा बँकांकडून ११ ते १४ टक्क्यांनी कर्ज घेतात. या रकमेतून १८ ते २४ टक्के व्याजाने या संस्था कर्जदारांना कर्जपुरवठा करीत असतात. एका कर्जदाराला दोन संस्थांकडून जास्तीतजास्त १ लाखांचेच कर्ज घेता येते. एमएफआयवर रिझर्व्ह बँकेची करडी नजर असते.
>एनपीए केवळ १ टक्का, वाढता विश्वास
एमएफआयच्या कर्ज वितरणात दरवर्षी ४९ टक्क्यांनी वाढ होत आहे. परंतु यांचा एनपीए जेमतेम १ टक्का इतका आहे. याबाबत श्रीवास्तव म्हणाले, बहुतांश कर्जदार महिला असल्याने संस्थांचा एनपीए अत्यल्प आहे. महिलांना समूह कर्ज वितरण देण्याची नियमावली आम्ही निश्चित केली आहे. महिला सहसा कर्ज बुडवत नाहीत वा पैसे घेऊन पळूनही जात नाहीत. समूहातील एकीने कर्जाची परतफेड न केल्यास दुसरी महिला तिला ते भरण्यास बाध्य करते. यामुळेच एमएफआयवरील विश्वास वाढता आहे.
मायक्रो फायनान्सचे कर्जदार २५%नी वाढले
कुठल्याही तारणाशिवाय कर्ज देणाऱ्या सूक्ष्म वित्त संस्थांचा (एमएफआय) सध्या जोमाने विस्तार होत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:02 AM2018-08-09T04:02:33+5:302018-08-09T04:02:43+5:30