नवी दिल्ली : मोबाईल हँडसेट निर्माती देशांतर्गत कंपनी मायक्रोमॅक्सने कोरियन सॅमसंगला पिछाडीवर टाकत भारतातील सर्वांत मोठी स्मार्टफोन कंपनी बनविली आहे. संशोधन कंपनी कॅनेलिसने ही माहिती दिली. दरम्यान, सॅमसंगने हे वृत्त फेटाळून लावत आपणच अव्वल स्थानी असल्याचा दावा केला आहे.
कॅनेलिसच्या अहवालात म्हटले की, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ च्या तिमाहीत गुडगाव येथे मुख्यालय असलेल्या मायक्रोमॅक्सची भारतीय स्मार्टफोन बाजारात सर्वाधिक हिस्सेदारी झाली आहे. जगातील सर्वांत मोठा हँडसेट बाजार असलेल्या भारतात कंपनी हिस्सेदारी २२ टक्के असून सॅमसंगचा वाटा २० टक्के राहिला. तथापि, सॅमसंगने कॅनेलिसचा हा अहवाल फेटाळून लावत जीएफकेच्या आकडेवारीनुसार, भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली हिस्सेदारी ३४.३ टक्के असल्याचे म्हटले आहे. यावरून सॅमसंग मायक्रोमॅक्सपेक्षा पुढे आहे. ‘मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे टाकत भारतीय बाजारात अव्वल ठरल्याचे’ कॅनेलिसने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
मायक्रोमॅक्स-सॅमसंग यांच्यात जुंपली!
मोबाईल हँडसेट निर्माती देशांतर्गत कंपनी मायक्रोमॅक्सने कोरियन सॅमसंगला पिछाडीवर टाकत भारतातील सर्वांत मोठी स्मार्टफोन कंपनी बनविली आहे.
By admin | Published: February 5, 2015 02:30 AM2015-02-05T02:30:43+5:302015-02-05T02:30:43+5:30