Lokmat Money > बिझनेस न्यूज > मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल; जगातील 'या' मोठ्या कंपन्यांनी इस्रायलमध्ये पैसा गुंतवला 

मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल; जगातील 'या' मोठ्या कंपन्यांनी इस्रायलमध्ये पैसा गुंतवला 

गेल्या तीन दिवसापासून हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:25 PM2023-10-12T12:25:18+5:302023-10-12T12:28:04+5:30

गेल्या तीन दिवसापासून हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे.

Microsoft Google Apple Intel These" big companies in the world invested money in Israel | मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल; जगातील 'या' मोठ्या कंपन्यांनी इस्रायलमध्ये पैसा गुंतवला 

मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल; जगातील 'या' मोठ्या कंपन्यांनी इस्रायलमध्ये पैसा गुंतवला 

गेल्या काही दिवसापासून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध दीर्घकाळ चालेल, असे मानले जात आहे. इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो. सुमारे ९० लाख लोकसंख्या असलेल्या इस्रायलचा GDP सुमारे ५२१.६९ अब्ज डॉलर आहे. इस्रायल हे जगातील स्टार्टअप कंपन्यांचे केंद्र मानले जाते. यामुळेच भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांतील कंपन्यांचे या देशात एक्स्पोजर आहे. भारतातील सुमारे १० लिस्टेड कंपन्यांनी इस्रायलमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, अदानी पोर्ट्स, एसबीआय, लार्सन अँड टुब्रो, भारत फोर्ज आणि सन फार्मा या कंपन्यांचा समावेश आहे.

इस्रायलमधील प्रत्येक व्यक्तीसाठी लष्करी प्रशिक्षण अनिवार्य आहे. हमासच्या हल्ल्यापासून, देशाच्या संरक्षण दलाने ३००,००० पेक्षा जास्त राखीव लोकांना ड्युटीवर बोलावले आहे. अलिकडच्या वर्षांत असे प्पहिल्यांदाच घडले आहे. इस्रायलचे लष्कर, हवाई दल आणि नौदलात १५०,००० सदस्य आहेत. यासोबतच इस्रायलच्या राखीव दलात ४५०,००० सदस्य आहेत. यामध्ये शिक्षक, तंत्रज्ञान कामगार, स्टार्टअप उद्योजक, शेतकरी, वकील, डॉक्टर, परिचारिका, पर्यटनाशी संबंधित लोक आणि कारखाना कामगार यांचा समावेश आहे.एका अहवालानुसार, या युद्धाचा इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.

Induslnd Bank बँकेत ९.९९% पर्यंत हिस्सा घेणार SBI म्युच्युअल फंड, शेअर्सवर परिणाम दिसणार?

हे युद्ध अनेक दिवस सुरु राहिल्यास,  बरेच दिवस कामे बंद राहणार आहेत. इस्रायलची निर्यात २०२२ मध्ये १६० अब्ज डॉलर पेक्षा जास्आहे. इस्रायलमधून युरोपला सर्वाधिक निर्यात होते. यानंतर अमेरिका आणि आशियाचा क्रमांक लागतो.या युद्धाचा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही कारण त्यामध्ये मोठ्या संख्येने परदेशी काम करतात. यामध्ये रासायनिक क्षेत्राचाही समावेश आहे, जे इस्रायलसाठी निर्यातीचे मुख्य स्त्रोत आहे. इस्रायलचा मृत समुद्राचा प्रदेश खनिजांनी समृद्ध आहे. अश्दोद बंदर गाझा पट्टीपासून फक्त २० मैलांवर आहे आणि पोटॅश निर्यातीचे केंद्र आहे.

इस्रायलचा स्टॉक इंडेक्स या आठवड्यात आतापर्यंत सहा टक्क्यांनी घसरला आहे. मात्र युद्धानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात तेजी येण्याची आशा आहे. अमेरिकेतील प्रत्येक टेक कंपनीने इस्रायलमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांची इस्रायलमध्ये संशोधन कार्यालये आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, अॅपल आणि ओरॅकल यांचा समावेश आहे. इंटेल इस्रायलमधील एका उत्पादन सुविधेतही गुंतवणूक करत आहे. हे ठिकाण गाझा सीमेपासून ३० मिनिटांच्या अंतरावर आहे.

Web Title: Microsoft Google Apple Intel These" big companies in the world invested money in Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.