मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये यापूर्वी घेतलेल्या पावलांमुळे कंपनीला मोठा नफा मिळत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमुळे मायक्रोसॉफ्टने असा आकडा गाठला आहे, जो इतर कोणतीही कंपनी गाठू शकली नाही. मायक्रोसॉफ्टचे मार्केट कॅप आठवड्याच्या शेवटी ३.१२५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे.
बॅरन्सच्या अहवालानुसार, शेअर्सच्या या वाढीमुळे मायक्रोसॉफ्टने ॲपलवर स्पष्ट आघाडी घेतली आहे. शुक्रवारी ॲपलची मार्केट कॅप २.९१६ ट्रिलियन डॉलर झाली होती. याआधी सर्वाधिक मार्केट कॅपचा विक्रम आयफोन बनवणाऱ्या ॲपलच्या नावावर होता. Apple ने जुलैमध्ये ३.०९ ट्रिलियन डॉलरची मार्केट कॅप केली होती. बॅरॉनच्या मते, मायक्रोसॉफ्ट ही ३.१ ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप मार्कला स्पर्श करणारी पहिली अमेरिकन कंपनी बनली आहे. मायक्रोसॉफ्टचे शेअर्स शुक्रवारी ४२०.५५ डॉलरवर बंद झाली.
LIC चे गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या 5 दिवसांत केली 86000 कोटींची कमाई
एआय क्षेत्रातील ओपन एआय सोबत मायक्रोसॉफ्टच्या भागीदारीमुळे दोन्ही कंपन्यांना खूप फायदा होत आहे. OpenAI ने तयार केलेले चॅट GPT जगभरात लोकप्रिय झाले आहे. एआयच्या वापरासाठी लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. हेच कारण आहे की बहुतेक गुंतवणूकदार मायक्रोसॉफ्ट स्टॉकमध्ये पैसे गुंतवत आहेत. मायक्रोसॉफ्टचा शेअर गेल्या १२ महिन्यांत जवळपास ६० टक्क्यांनी वाढला आहे.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी अलीकडेच सांगितले की, आता आम्ही एआयबद्दल बोलण्यापलीकडे गेलो आहोत आणि ते वापरण्याच्या प्रक्रियेत आलो आहोत. आम्हाला नवीन ग्राहक मिळत आहेत. यातून कंपनीला नवे फायदे मिळत आहेत. सत्या नडेला यांनी नुकतेच मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणून दहावे वर्ष पूर्ण केले. क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर देऊन त्यांनी मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीला नवी दिशा दाखवली आहे. नडेला यांनी २०१४ मध्ये कंपनीची कमान हाती घेतली होती.