Lokmat Money > बिझनेस न्यूज > मायक्रोसॉफ्ट भारतात करणार नवी भरती; डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक

मायक्रोसॉफ्ट भारतात करणार नवी भरती; डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक

माहेश्वरी यांनी सांगितले की, कंपनी मोठा डेटा स्थानिक पातळीवर साठवून ठेवत आहे. त्यासाठी कंपनीने तीन डेटा केंद्रे उभारली आहेत. आता त्यांचा विस्तार केला जात आहे. आम्ही हे कोविड-१९ च्या काळात केले आहे, हे विशेष.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 11:06 PM2020-06-15T23:06:45+5:302020-06-15T23:07:11+5:30

माहेश्वरी यांनी सांगितले की, कंपनी मोठा डेटा स्थानिक पातळीवर साठवून ठेवत आहे. त्यासाठी कंपनीने तीन डेटा केंद्रे उभारली आहेत. आता त्यांचा विस्तार केला जात आहे. आम्ही हे कोविड-१९ च्या काळात केले आहे, हे विशेष.

Microsoft to recruit in India Investment in data centers | मायक्रोसॉफ्ट भारतात करणार नवी भरती; डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक

मायक्रोसॉफ्ट भारतात करणार नवी भरती; डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या मंदीला न जुमानता भारतात नव्याने नोकरभरती करण्याचा, तसेच डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय अमेरिकेची बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने जाहीर केला आहे.

मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी यांनी सांगितले की, भारतात डेटा सेंटर असलेल्या पहिल्या काही मोजक्याच कंपन्यांत मायक्रोसॉफ्टचा समावेश आहे. आमची तीन डेटा केंद्रे भारतात कार्यान्वित झाली आहेत. आम्ही आमची क्षमता वाढवीत आहोत. त्यासाठी भारतातील गुंतवणूक सुरू ठेवणार आहोत. भारतातील आपल्या व्यावसायिक योजना कायम ठेवण्याची आमची इच्छा आहे. डिजिटल क्षमतावाढ, तंत्रज्ञान क्षमतावाढ आणि नवीनता यासाठी आमची गुंतवणूक सुरूच राहील. माहेश्वरी यांनी सांगितले की, कंपनी मोठा डेटा स्थानिक पातळीवर साठवून ठेवत आहे. त्यासाठी कंपनीने तीन डेटा केंद्रे उभारली आहेत. आता त्यांचा विस्तार केला जात आहे. आम्ही हे कोविड-१९ च्या काळात केले आहे, हे विशेष.

लोक डेटाचे मूल्य जाणू लागले आहेत
मायक्रोसॉफ्ट भारतात आणखी नोकरभरती करणार आहे का, या प्रश्नावर माहेश्वरी यांनी सांगितले की, ‘होय. आमच्या सध्याच्या अनुमानानुसार आम्ही नोकरभरती सुरू ठेवणार आहोत.’
क्लाउड आणि डेटा केंद्रे याबाबत माहेश्वरी यांनी सांगितले की, यात तीन मुख्य भाग आहेत. पायाभूत सेवा, प्लॅटफॉर्म सेवा आणि सॉफ्टवेअर सेवा हे ते तीन भाग होत. लोक डेटाचे मूल्य आता जाणू लागले आहेत. योग्य फॉरमॅटमधील डेटा तुम्हाला योग्य कृती करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

Web Title: Microsoft to recruit in India Investment in data centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.