Microsoft Laid Off: मायक्रोसॉफ्टनं अलीकडेच आपल्या कंपनीतील लोकांची संख्या कमी करताना सुमारे १००० लोकांना कंपनीतून काढून टाकलंय. अहवालानुसार, कंपनीनं वर्षाच्या सुरुवातीलाच १०००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली होती. टेक कंपनीनं गेल्या आठवड्यात अतिरिक्त जॉब्स एलिमिनेट करण्याची घोषणा केली होती. नोकऱ्यांमधील या कपातीचा परिणाम कंपनीच्या इमेजवरही झाला आहे.
बिझनेस इन्साइडरच्या रिपोर्टनुसार, कंपनीनं नुकत्याच केलेल्या कर्मचारी कपातीचा कस्टमर सर्व्हिस विभागावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. इंजिनिअरिंग प्रोजेक्ट मॅनेजर्स आणि मार्केटिंग विभागांनाही याचा चांगलाच फटका बसला आहे. नोकर्या कमी करून मायक्रोसॉफ्टनं डिजिटल सेल्स आणि सक्सेस ग्रुप सेल्स, कस्टमर सर्व्हिस टीम्स बंद केल्या आहेत. कंपनीनं ग्राहक कस्टमर सोल्युशन मॅनेजरचा रोलही बंद केलाय. काही कर्मचार्यांना कंपनीनं कस्टमर सक्सेस अकाउंट मॅनेजमेंट सारख्या इतर भूमिकांवर शिफ्ट केलंय.
रिपोर्ट आला समोरमायक्रोसॉफ्टमध्ये होत असलेल्या या बदलांबाबत एका जाणकारानं माहिती दिली. आता ग्राहकांना मदत करण्यापेक्षा उत्पादनांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी कस्टमर सर्व्हिस ग्रुपमध्ये जे सर्वाधिक प्रमोट करण्यात आले होते ते आता डिमांड पूर्ण करू शकत नाहीयेत. रिपोर्टनुसार, अनेक मॅनेजर्सना या कपातीची माहितीही नव्हती.