मायक्रोसॉफ्टने जगाला पुन्हा एकदा वेठीस धरले होते. वायटूके नंतर मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर बंद पडल्याने जगभरातील काम ठप्प झाले होते. क्राऊडस्ट्राईकमुळे ५०० फॉर्च्युन कंपन्यांना तब्बल ५.४ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
क्लाऊड आऊटेड रिस्क पार्टनर पॅरामेट्रिक्सने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांना अब्जावधींचे नुकसान सहन करावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
क्राऊडस्ट्राईकमुळे जगभरातील हेल्थकेअर, एअरलाईन्स आणि बँकिंग इंडस्ट्रीला झटका लागला होता. एका हार्डवेअर फेल्युअरमुळे अवघे जग वेठीस धरले गेले होते. यामुळे ५०० फॉर्च्युन कंपन्यांना २५ टक्क्यांपर्यंतचा व्यवसाय गमवावा लागला असल्याचे पॅरामेट्रिक्सने म्हटले आहे.
इन्शूअर्ड लॉसबाबत सांगायचे झाले तर अर्धा ते १ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. जर एवढी घसरण झाली तर त्याचा अर्थ कंपन्यांना १० ते २० टक्के आर्थिक नुकसान झाले आहे.
Azure बॅकएंड वर्कलोडच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल करण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे स्टोरेज आणि कॉम्प्युटर रिसोर्सेसमध्ये व्यत्यय आला व कनेक्टिव्हिटी बंद झाली. या त्रुटीमुळे मायक्रोसॉफ्ट 365 सेवांवर परिणाम झाला होता. CrowdStrike ही सायबर सुरक्षा फर्म आहे. हॅकर्स, सायबर हल्ले, रॅन्समवेअर आणि डेटा लीकपासून ही कंपनी सेवा घेणाऱ्या कंपन्यांचे संरक्षण करते. मायक्रोसॉफ्टच्या सेवा घेणाऱ्यांना सायबर सिक्यरिटी पुरविणाऱ्या क्राऊड स्ट्राईकच्या कामात खराबी आल्याने ही स्थिती निर्माण झाली होती.