लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहतील. यात सार्वजनिक सुट्या, रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार यांचा समावेश आहे. ऑक्टोबरमधील ३१ दिवसांपैकी १६ दिवस सुट्यांत जाणार असल्यामुळे बँक ग्राहकांना आपल्या बँकिंगविषयक कामाचे नीट नियोजन करावे लागेल.
विशेष म्हणजे, १ ऑक्टोबर रोजी रविवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच २ दिवस सुट्या आल्या आहेत.
अशा असतील सुट्ट्या
n२ ऑक्टो : गांधी जयंती (देशभर)
n१४ ऑक्टो: महालया (कोलकाता)
n१८ ऑक्टो : कटी बिहू (आसाम)
n२१ ऑक्टो : दुर्गा पूजा (त्रिपुरा, आसाम, मणिपूर व बंगाल)
n२३ ऑक्टो : दसरा/महानवमी (कर्नाटक, ओडिशा, तामिळडू, आसाम, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार)
n२४ ऑक्टो : विजयादशमी/(आंध्र प्रदेश, मणिपूर वगळून सर्व राज्यांत)
n२५ ऑक्टो : दुर्गा पूजा (सिक्किम)
n२६ ऑक्टो : दुर्गा/विलय दिवस (सिक्किम, जम्मू-कश्मीर)
n२७ ऑक्टो : दुर्गा पूजा (सिक्किम)
n२८ ऑक्टो : लक्ष्मी पूजा ( बंगाल)
n३१ ऑक्टो : सरदार वल्लभभाई पटेल जयंती (गुजरात)