Join us

अर्धा ऑक्टोबर बँका बंद, कर्मचाऱ्यांची लाॅटरीच; अशा आहेत सुट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 7:10 AM

कामाचे आधीच नियोजन करून ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात १६ दिवस बँका बंद राहतील. यात सार्वजनिक सुट्या, रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार यांचा समावेश आहे. ऑक्टोबरमधील ३१ दिवसांपैकी १६ दिवस सुट्यांत जाणार असल्यामुळे बँक ग्राहकांना आपल्या बँकिंगविषयक कामाचे नीट नियोजन करावे लागेल. विशेष म्हणजे, १ ऑक्टोबर रोजी रविवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच २ दिवस सुट्या आल्या आहेत. 

अशा असतील सुट्ट्याn२ ऑक्टो : गांधी जयंती (देशभर) n१४ ऑक्टो: महालया (कोलकाता) n१८ ऑक्टो : कटी बिहू (आसाम) n२१  ऑक्टो : दुर्गा पूजा (त्रिपुरा, आसाम, मणिपूर व बंगाल) n२३ ऑक्टो : दसरा/महानवमी (कर्नाटक, ओडिशा, तामिळडू, आसाम, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार)n२४ ऑक्टो : विजयादशमी/(आंध्र प्रदेश, मणिपूर वगळून सर्व राज्यांत)n२५ ऑक्टो : दुर्गा पूजा (सिक्किम) n२६ ऑक्टो : दुर्गा/विलय दिवस (सिक्किम, जम्मू-कश्मीर) n२७ ऑक्टो : दुर्गा पूजा (सिक्किम) n२८ ऑक्टो : लक्ष्मी पूजा ( बंगाल)n३१ ऑक्टो : सरदार वल्लभभाई पटेल जयंती (गुजरात)

टॅग्स :बँककर्मचारीबँकिंग क्षेत्र