Join us  

पाणीपुरीवालेही मध्यमवर्गीय!

By admin | Published: July 26, 2016 1:53 AM

भारतात मध्यम वर्गाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. पाणीपुरी विक्रेते, डोसा विक्रेते, सुतारकाम करणारे, वेल्डिंगवाले, लाँड्रीवाले, वाहन चालक, केबल टीव्ही

मुंबई : भारतात मध्यम वर्गाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. पाणीपुरी विक्रेते, डोसा विक्रेते, सुतारकाम करणारे, वेल्डिंगवाले, लाँड्रीवाले, वाहन चालक, केबल टीव्ही तंत्रज्ञ आदी छोट्या व्यावसायिकांनी मध्यम वर्गात प्रवेश केला आहे. हा वर्ग आतापर्यंत गरिबीत खितपत पडलेला होता. अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा लाभ मिळाल्याने त्यांनी मध्यम वर्गात झेप घेतली आहे.मुंबई विद्यापीठाच्या ‘स्कूल इकॉनॉमिक्स’मधील प्राध्यापक नीरज हातेकर, किशोर मोरे आणि संध्या कृष्णा यांनी ‘द राइज आॅफ द न्यू मिडल क्लास अँड रोल आॅफ आॅफशोअरिंग आॅफ सर्व्हिसेस’ या नावाचा एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली.कुटुंबात अनेक कमावते असल्याने वाढला दर्जाविविध प्रकारचे छोटे व्यवसाय करणारे हे लोक कनिष्ठ मध्यम वर्गात पोहोचले आहेत. जागतिक पातळीवरील मापदंडानुसार रोज २ डॉलरपेक्षा (सुमारे १३४ रुपये) कमी मिळकत असलेले लोक गरीब या श्रेणीत, २ ते ४ डॉलर (सुमारे १३४ ते २६८) रुपये कमावणारे लोक कनिष्ठ मध्यम वर्गात येतात. ४ ते ६ डॉलर (२६८ ते ४0२ रुपये) कमावणारे मध्यम वर्गात, तर ६ ते १0 डॉलर (४0२ ते ६७0 रुपये) कमावणारे उच्च मध्यम वर्गात येतात. कनिष्ठ मध्यम वर्ग गरिबांपेक्षा जास्त पैसे कमावतो. वेगळ्या व्यवसायात आहे, म्हणून हा वर्ग जास्त पैसे कमावतो, असे नाही. कनिष्ठ मध्यम वर्गात नव्याने प्रवेश झालेल्या घरांतील प्रत्येक सदस्याकडे फोन, घड्याळ आहे. ७0 टक्के घरांत वीज आहे. ६0 टक्के घरांत पंखा, रंगीत टीव्ही, प्रेशर कुकर व किमान एक खुर्ची आहे. अर्ध्यापेक्षा जास्त घरांत सोन्याचे दागिने, स्टीलची भांडी आहेत. मध्यम वर्गाचा सामाजिक आधार वाढत आहे. विविध जाती, व्यवसाय, वय, लिंग व भूगोल मध्यम वर्गाच्या कक्षेत येत आहे. स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सने ८00 कुटुंबांचा सर्व्हे केला आहे. त्यात स्थित्यंतराची ही माहिती समोर आली. - प्रा. वेंकटेश कुमार, ‘सेंटर फॉर गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी’