मिहान इंडिया... २ ...
By admin | Published: August 11, 2015 10:23 PM2015-08-11T22:23:18+5:302015-08-11T22:23:18+5:30
>विमानतळाची सुरक्षा केंद्राकडेएका प्रश्नाच्या उत्तरात कंपनीने सांगितले की, कार्यालयात व्यवहार मराठीतच करावा, अशा प्रकारचे कोणतेही आदेश कार्यालयाला प्राप्त झालेले नाहीत आणि तशा प्रकारची प्रत या कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे तशी प्रत देणे शक्य नाही. कंपनीने सांगितले की, नागपूर विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र शासनाकडे आहे आणि ती सीआयएसएफतर्फे पार पाडण्यात येते. सुरक्षेच्या कारणासाठी १ जानेवारी २०१० ते ३० जून २०१५ पर्यंत ५९.७० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. कंपनीत १५ जण कार्यरत असून एमएडीसीचे पाच वरिष्ठ अधिकारी आणि एएआयचा एक अधिकारी मिहान इंडियात प्रतिनियुक्तीवर आहेत तर ८ अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय हवामान खात्याकडून कंपनी कोणतीही सेवा घेत नसल्यामुळे या खात्याला कोणतीच रक्कम देण्यात येत नसल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक अबधेश प्रसाद यांनी अभय कोलारकर यांना माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या लेखी प्रश्नांच्या उत्तरात दिली.