Lokmat Money > बिझनेस न्यूज > दूध उद्योग सापडला संकटात, उत्पादनात ६ टक्क्यांनी वाढ

दूध उद्योग सापडला संकटात, उत्पादनात ६ टक्क्यांनी वाढ

देशात दुधाचे अतिउत्पादन झाल्यामुळे किमती प्रचंड प्रमाणात घसरल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून डेअरी उद्योग संकटात सापडला आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 06:33 AM2018-08-14T06:33:55+5:302018-08-14T06:34:30+5:30

देशात दुधाचे अतिउत्पादन झाल्यामुळे किमती प्रचंड प्रमाणात घसरल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून डेअरी उद्योग संकटात सापडला आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहे.

The milk industry is in trouble, the production has increased by 6 percent | दूध उद्योग सापडला संकटात, उत्पादनात ६ टक्क्यांनी वाढ

दूध उद्योग सापडला संकटात, उत्पादनात ६ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : देशात दुधाचे अतिउत्पादन झाल्यामुळे किमती प्रचंड प्रमाणात घसरल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून डेअरी उद्योग संकटात सापडला आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहे.
भाव घसरल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अलीकडे आंदोलन करीत आहेत. शेतकरी दूध रस्त्यावर ओतून देत असल्याचे चित्र देशभरात दिसून येत आहे. दुधाचे अतिउत्पादन हेच त्या समस्येमागील मुख्य कारण असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
आॅल इंडिया प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशनचे (पीडीएफए) एस. दलजित सिंग यांनी सांगितले की, गेल्या १२ महिन्यांत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाºया दुधाच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून दूध उत्पादनात दरवर्षी ६ टक्के वाढ होत आहे. २०१६-१७ मध्ये देशात १६५.४ दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले होते. २०१७-१८ मध्ये ६.५ टक्के वाढीसह ते १७६.३५ दशलक्ष टनांवर जाईल, असा अंदाज आहे.
हॅटसन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट लि.चे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक आर. जी. चंद्रमोगन यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर मलई काढलेल्या (स्कीम्ड) दूध भुकटीच्या किमतींत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे भारताची दूध भुकटी निर्यात कमालीची घटली आहे. सध्या देशात २ लाख टन अतिरिक्त दूध भुकटीचा साठा पडून आहे. २०१७-१८ मध्ये जागतिक बाजारात दूध भुकटीचा भाव १२० रुपये किलो होता. भारतातील तिचा उत्पादन खर्च मात्र २०० रुपये किलो आहे.

भुगटी निर्यातही थंडावली

मुंबईस्थित कॉम्रेड लिमिटेडचे विश्लेषक अनिमेश कालरा यांनी सांगितले की, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून उरलेल्या दुधाची भुकटी बनवून निर्यात केली जाते.
भुकटीच्या किमती उतरल्यामुळे निर्यात बंद झाली आहे, तसेच भुकटी बनविण्याचे उद्योगही थंडावले आहेत. देशात दुधाची जास्तीची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे दुधाचे भाव कोसळत आहेत.

Web Title: The milk industry is in trouble, the production has increased by 6 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.