जगाव :यंदा जिल्ात सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असुन, त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत देखील पहायला मिळाला. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत सुमारे ७० ते ८० कोटीहुन अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे बाजारात असलेली मंदीचे सावट यंदा दुर झालेले पहायला मिळाले. शहरातील सराफा बाजार, वाहन बाजार, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंची मोठी उलाढाल झालेली पहायला मिळाली. गेल्या वर्षी दुष्काळाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर पहायला मिळाला. उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकरीवर्ग खरेदीपासुन दुरच होता. त्यामुळे बाजारात मंदी झालेली पहायला मिळाली. परंतु यंदा जिल्ासह संपुर्ण राज्यात वरुण राजाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्ग नफ्यात आहे. तसेच नोकरदारांना मिळालेल्या वेतन वाढीचा परिणाम बाजारात दिसुन आला. सुवर्ण बाजार बहरलासुवर्ण बाजारात सुमारे १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज सराफा व्यापार्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी सुवर्ण बाजारात अस्थिरतेचे वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे गुंतवणुक दारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरविली होती. तसेच त्यामुळे गेल्यावर्षी ऐन दिवाळीत २ ते ३ कोटीची उलाढाल झाली होती. परंतु यंदा सुवर्ण बाजारात गुंतरवणुकदारांसह नोकरदार, शेतकरीवर्गाकडुन मोठी खरेदी झाल्याची माहिती आर.एल.ज्वेलर्सचे व्यवस्थापक प्र्रकाश नहाटा यांनी दिली. तसेच पुढे येणार्या लग्नसराईमुळे देखील सोने खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज आहे. वाहनबाजारही सुसाट वाहन बाजारात देखील मोठी उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीत ग्राहकांची मागणी पाहता विविध वाहन कंपण्याकडुन लोन मध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांकडून देखील चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे. शहरात सुमारे दिवाळी काळात २ हजारहुन अधिक दुचाकी खरेदी झाल्याची माहिती वाहन होंडाचे व्यवस्थापक किरण चौधरी यांनी दिली. तर ३०० ते ३५० चारचाकी वाहनांची विक्री दिवाळीच्या चार दिवसात झाल्याची माहिती मानराज मोटर्सचे संचालक निंकुभ यांनी दिली. वाहन बाजारात सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल यंदा दिवाळीत झाल्याचा अंदाज आहे. चारचाकी वाहनांसह शेतकरी वर्गाकडुन ट्रॅक्टरची देखील मोठी खरेदी झाली आहे.
बाजारात कोट्यवधीची उलाढाल
जळगाव :यंदा जिल्ात सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असुन, त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत देखील पहायला मिळाला. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत सुमारे ७० ते ८० कोटीहुन अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे बाजारात असलेली मंदीचे सावट यंदा दुर झालेले पहायला मिळाले. शहरातील सराफा बाजार, वाहन बाजार, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंची मोठी उलाढाल झालेली पहायला मिळाली.
By admin | Published: November 2, 2016 12:42 AM2016-11-02T00:42:40+5:302016-11-02T00:42:40+5:30