Lokmat Money > बिझनेस न्यूज > डेटिंगवर उधळले लाखो रुपये; भारतात विविध ॲप्सची वर्षभरात ४१५ दशलक्ष डॉलर्सची कमाई

डेटिंगवर उधळले लाखो रुपये; भारतात विविध ॲप्सची वर्षभरात ४१५ दशलक्ष डॉलर्सची कमाई

डाऊनलोड केलेल्या ॲप्समध्ये डेटिंगसाठी लोकप्रिय बंबल ॲपचाही समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 01:55 PM2024-01-08T13:55:34+5:302024-01-08T13:55:46+5:30

डाऊनलोड केलेल्या ॲप्समध्ये डेटिंगसाठी लोकप्रिय बंबल ॲपचाही समावेश आहे.

Millions of rupees squandered on dating; 415 million dollars a year revenue of various apps in India | डेटिंगवर उधळले लाखो रुपये; भारतात विविध ॲप्सची वर्षभरात ४१५ दशलक्ष डॉलर्सची कमाई

डेटिंगवर उधळले लाखो रुपये; भारतात विविध ॲप्सची वर्षभरात ४१५ दशलक्ष डॉलर्सची कमाई

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मोबाइल आणि इंटरनेटचा वेग तुफान वाढल्यापासून देशात विविध ॲप्स डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२३ या संपूर्ण वर्षभरात विविध स्टोअरमधून झालेल्या डाऊनलोडिंगमधून भारतातून विविध ॲप्सनी ४१.५ कोटी डॉलर्सची कमाई केली आहे.

डाऊनलोड केलेल्या ॲप्समध्ये डेटिंगसाठी लोकप्रिय बंबल ॲपचाही समावेश आहे. ॲनालिस्ट प्लॅटफॉर्म डेटा डॉट एआयच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. २०२३ मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत ॲप्स डाऊनलोडमधून झालेल्या कमाईचे प्रमाण वाढले असले तरी जागतिक स्तरावर भारत आजही २५ व्या स्थानी आहे. फायनान्स. एंटरटेन्मेंट, शॉपिंग, बिझनेस, एज्युकेशन आणि लाइफस्टाइल आदी श्रेणीतील ॲप्स मोठ्या प्रमाणावर भारतात डाऊनलोड करण्यात आले.

डाऊनलोडिंगचे प्रमाण घटले?

  • २५९६ कोटी ॲप्स (वर्ष २०२३)
  • २८०० कोटी ॲप्स (वर्ष २०२२)


वर्षभरात कुणी किती कमावले?

  • गुगल प्ले स्टोअर- १.९ कोटी डाॅलर्स
  • सी या प्लेस्टोअर- १.६ कोटी डाॅलर्स
  • डेटिंग ॲप बंबल- १.१ कोटी डाॅलर्स
  • टेनसेंट- १ कोटी  डाॅलर्स

(स्रोत : ‘डेटा डॉट एआय’चा अहवाल)

सर्वाधिक लोकप्रिय

  • गेमिंग ॲप्स- ९.३ अब्ज 
  • सोशल मीडिया ॲप्स- २.३६ अब्ज 
  • फोटो, व्हिडीओ- १.८६ अब्ज

Web Title: Millions of rupees squandered on dating; 415 million dollars a year revenue of various apps in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.