नवी दिल्ली : केंद्र सरकार यावर्षी आणखी १ हजार जनऔषधी केंद्र सुरू करणार आहे. या दुकानांमधून जेनरिक औषधांची विक्री हाेते. ती नामांकित कंपन्यांच्या औषधांच्या तुलनेत सुमारे ५० ते ९० टक्के स्वस्त असतात.
सध्या देशभरातील ७४३ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९ हजार केंद्र सुरू आहेत. त्यातून ८ वर्षांत लाेकांचे सुमारे १८ हजार कोटी रुपये वाचले आहेत. चालू आर्थिक वर्षात लाेकांची ४ हजार ५०० काेटी रुपये वाचले आहेत.
वर्ष विक्री बचत
(आकडे काेटी रुपयांमध्ये)
२०२०-२१ ६६५ ४,०००
२०२१-२२ ८९३ ५,३००
२०२२-२३ ७५८ ४,५००