Join us

स्वस्त औषधांमुळे लाेकांचे काेट्यवधी रुपये वाचणार, १ हजार जनऔषधी केंद्रे हाेणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 10:43 AM

सध्या देशभरातील ७४३ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९ हजार केंद्र सुरू आहेत. त्यातून ८ वर्षांत लाेकांचे सुमारे १८ हजार कोटी रुपये वाचले आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकार यावर्षी आणखी १ हजार जनऔषधी केंद्र सुरू करणार आहे. या दुकानांमधून जेनरिक औषधांची विक्री हाेते. ती नामांकित कंपन्यांच्या औषधांच्या तुलनेत सुमारे ५० ते ९० टक्के स्वस्त असतात. 

सध्या देशभरातील ७४३ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९ हजार केंद्र सुरू आहेत. त्यातून ८ वर्षांत लाेकांचे सुमारे १८ हजार कोटी रुपये वाचले आहेत. चालू आर्थिक वर्षात लाेकांची ४ हजार ५०० काेटी रुपये वाचले आहेत. 

वर्ष     विक्री    बचत  (आकडे काेटी रुपयांमध्ये)२०२०-२१      ६६५     ४,०००२०२१-२२      ८९३     ५,३००२०२२-२३      ७५८     ४,५००

टॅग्स :वैद्यकीय