Lokmat Money > बिझनेस न्यूज > देणगी देण्यात सर्वात पुढे पण प्रसिद्धीपासून राहतात दूर! फार कमी लोकांनाच माहिती आहे नाव

देणगी देण्यात सर्वात पुढे पण प्रसिद्धीपासून राहतात दूर! फार कमी लोकांनाच माहिती आहे नाव

susmita and subroto bagchi : माध्यम आणि प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या एका उद्योगपती जोडप्याचं देशातील पहिल्या १० दानशूर लोकांमध्ये नाव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:53 AM2024-11-13T10:53:16+5:302024-11-13T10:54:14+5:30

susmita and subroto bagchi : माध्यम आणि प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या एका उद्योगपती जोडप्याचं देशातील पहिल्या १० दानशूर लोकांमध्ये नाव आहे.

mindtree susmita and subroto bagchi businessman is ahead in donating stays away from limelight | देणगी देण्यात सर्वात पुढे पण प्रसिद्धीपासून राहतात दूर! फार कमी लोकांनाच माहिती आहे नाव

देणगी देण्यात सर्वात पुढे पण प्रसिद्धीपासून राहतात दूर! फार कमी लोकांनाच माहिती आहे नाव

susmita and subroto bagchi : दुसऱ्यांना मदत करताना उपकाराची नाही तर परोपकाराची भावना मनामध्ये असावी असं म्हणतात. उजव्या हाताने मदत केली तर डाव्या हाताला कळू नये. अर्थात काही लोक वितभर मदत हातभर करुन सांगतात तो भाग वेगळा. मात्र, देशात असंही एक जोडपं आहे. जे मोठी आर्थिक मदत करुनही प्रिसिद्धीपासून दूर राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी हुरुन इंडियाने सर्वाधिक परोपकारी लोकांची यादी जाहीर केली होती. या यादीत त्या १० जणांची नावे आहेत, ज्यांनी यावर्षी सर्वाधिक देणगी दिली आहे. या यादीत मुकेश अंबानी, अदानी यांसारख्या अनेक बड्या उद्योगपतींची नावे होती. पहिल्या क्रमांकाबद्दल बोलायचे झाले तर या यादीत शिव नाडर यांचे नाव आघाडीवर आहे. शिव नाडर हे एचसीएल एंटरप्रायझेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २,१५३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर राहूनही करोडो रुपयांची देणगी देणाऱ्या हुरुन इंडियाच्या यादीत एका व्यावसायिक जोडप्याचे नावही आहे. सुब्रतो आणि सुष्मिता बागची असे या उद्योगपतींचं नाव आहे. आर्थिक वर्ष २०१४ मध्ये त्यांनी एकूण १७९ कोटी रुपयांची देणगी दिली.

देशातील दानशूर व्यक्तींच्या यादीत ९व्या स्थानी
सुब्रतो आणि सुष्मिता बागची हे माइंडट्रीचे सह-संस्थापक असून पती-पत्नी देखील आहेत. हुरुन इंडियाच्या यादीत ते नवव्या क्रमांकावर होते. सुष्मिता बागची ह्या एक प्रसिद्ध ओडिया लेखिका देखील आहे. हे दोघेही दरवर्षी कोट्यवधी रुपयांची देणगी देतात. २०२२ मध्ये त्यांनी आरोग्य सेवांसाठी एकूण २१३ कोटी रुपयांची देणगी दिली होती. सन २०२३ मध्येही त्यांनी ११० कोटी रुपयांची देणगी दिली होती. एवढेच नाही तर २०२१ मध्ये त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलच्या स्थापनेसाठी ३४० कोटी रुपयांची देणगी दिली होती.

कोण आहेत सुब्रोतो आणि सुष्मिता बागची?
सुब्रोतो आणि सुष्मिता बागची हे IT क्षेत्रातील मोठ्या कंपनी माइंडट्रीचे सह-संस्थापक आहेत. त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन ५६,६४३ कोटी रुपये आहे. एवढी देणगी देऊनही हे जोडपं मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर आहे. कटकमध्ये जन्मलेल्या सुष्मिता बागची या प्रसिद्ध ओरिया लेखिका शकुंतला पांडा यांच्या कन्या आहेत. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत, त्या केवळ एक प्रसिद्ध ओडिया लेखिका बनल्या नाहीत तर मासिक महिला प्रकाशन सुचरिताच्या क्रिएटरही आहेत. राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम केलं आहे.
 

Web Title: mindtree susmita and subroto bagchi businessman is ahead in donating stays away from limelight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.