Lokmat Money > बिझनेस न्यूज > खनिज तेल २७ डॉलरच्या खाली

खनिज तेल २७ डॉलरच्या खाली

‘ओपेक’ राष्ट्रांकडून वाढीव उत्पादन, तसेच अमेरिकेत मागणीपेक्षा जास्त असलेला पुरवठा यामुळे आशियात गुरुवारी अमेरिकी खनिज तेलाचे भाव २७ अमेरिकी डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली घसरले.

By admin | Published: February 12, 2016 03:47 AM2016-02-12T03:47:08+5:302016-02-12T03:47:08+5:30

‘ओपेक’ राष्ट्रांकडून वाढीव उत्पादन, तसेच अमेरिकेत मागणीपेक्षा जास्त असलेला पुरवठा यामुळे आशियात गुरुवारी अमेरिकी खनिज तेलाचे भाव २७ अमेरिकी डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली घसरले.

Mineral oil below $ 27 | खनिज तेल २७ डॉलरच्या खाली

खनिज तेल २७ डॉलरच्या खाली

सिंगापूर : ‘ओपेक’ राष्ट्रांकडून वाढीव उत्पादन, तसेच अमेरिकेत मागणीपेक्षा जास्त असलेला पुरवठा यामुळे आशियात गुरुवारी अमेरिकी खनिज तेलाचे भाव २७ अमेरिकी डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली घसरले.
पाच फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेतील तेलसाठा घसरून ८,००,००० बॅरलपर्यंत आल्याचे ऊर्जा विभागाच्या साप्ताहिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. असे असूनही तेलाच्या किमती घसरल्या.
मार्चमधील डिलेव्हरीसाठी यूएस बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा भाव ५५ सेंटनी म्हणजे २.० टक्क्यांनी घसरून २६.९० अमेरिकी डॉलर, तर एप्रिलमधील डिलेव्हरीसाठीचा सेंट क्रूडचा दर ३२ सेंटनी म्हणजे १.०४ टक्क्यांनी घसरून ३०.५२ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल झाला. यापूर्वीच्या सत्रात वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा भाव घसरून २६.८५ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल झाला होता. २० जानेवारी रोजी वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा भाव २६.१९ अमेरिकी डॉलर प्रतिबॅरलपर्यंत घसरला होता; मात्र त्याच दिवशी बाजार बंद होताना हा दर २६.५५ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल झाला होता. २००३ नंतरचा हा सर्वांत नीचांकी भाव होता. अमेरिकी तेलसाठ्याचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी काही काळ तेलाच्या किमती सावरल्या होत्या.

Web Title: Mineral oil below $ 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.