Join us

खनिज तेल २७ डॉलरच्या खाली

By admin | Published: February 12, 2016 3:47 AM

‘ओपेक’ राष्ट्रांकडून वाढीव उत्पादन, तसेच अमेरिकेत मागणीपेक्षा जास्त असलेला पुरवठा यामुळे आशियात गुरुवारी अमेरिकी खनिज तेलाचे भाव २७ अमेरिकी डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली घसरले.

सिंगापूर : ‘ओपेक’ राष्ट्रांकडून वाढीव उत्पादन, तसेच अमेरिकेत मागणीपेक्षा जास्त असलेला पुरवठा यामुळे आशियात गुरुवारी अमेरिकी खनिज तेलाचे भाव २७ अमेरिकी डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली घसरले.पाच फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेतील तेलसाठा घसरून ८,००,००० बॅरलपर्यंत आल्याचे ऊर्जा विभागाच्या साप्ताहिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. असे असूनही तेलाच्या किमती घसरल्या.मार्चमधील डिलेव्हरीसाठी यूएस बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा भाव ५५ सेंटनी म्हणजे २.० टक्क्यांनी घसरून २६.९० अमेरिकी डॉलर, तर एप्रिलमधील डिलेव्हरीसाठीचा सेंट क्रूडचा दर ३२ सेंटनी म्हणजे १.०४ टक्क्यांनी घसरून ३०.५२ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल झाला. यापूर्वीच्या सत्रात वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा भाव घसरून २६.८५ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल झाला होता. २० जानेवारी रोजी वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा भाव २६.१९ अमेरिकी डॉलर प्रतिबॅरलपर्यंत घसरला होता; मात्र त्याच दिवशी बाजार बंद होताना हा दर २६.५५ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल झाला होता. २००३ नंतरचा हा सर्वांत नीचांकी भाव होता. अमेरिकी तेलसाठ्याचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी काही काळ तेलाच्या किमती सावरल्या होत्या.